मोठी बातमी! आलिया नव्हे, ‘या’ चाहतीशी लग्न करतोय रणबीर कपूर


मुंबई : Alia bhatt Ranbir kapoor wedding अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर आता लग्न करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. आलिया आणि रणबीर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचं नातं आता सर्वश्रृत आहे. तिथे सर्वत्रच या लग्नाच्या चर्चा सुरु असताना आता याच सेलिब्रिटी जोडीशी संबंधित अत्यंत मोठी माहिती समोर आली आहे. 

ही माहिती सर्वांच्याच भुवया उंचावत आहे. कारण आता म्हणे रणबीर आलियाशी नव्हे, त्याच्या सर्वात मोठ्या चाहतीशी लग्न करणार आहे. 

बसला ना धक्का ? आलियाशी रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी रणबीरचं नाव काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. पण, आलियाशी जवळीक होताच रणबीर आता काही तिच्यापासून दुरावणार नाही, असंही स्पष्ट झालं. 

पण, आता या दोघांमध्ये ही चाहती कधी आणि कशी आली? 

तर, ऐन लग्नादरम्यानच रणबीरच्या ज्या चाहत्याची चर्चा सुरु आहे, ती आहे खुद्द आलिया. आलियानं फार आधीच सांगितलं होतं की ती रणबीरच्या फार आधीपासूनच प्रेमात होती. 

ती रणबीरची सर्वात मोठी चाहती होती. आपल्या आवडत्या कलाकारासोबत आलियाचं स्क्रीन शेअर करण्याचं आणि थेट त्याची जोडीदार होण्याचंही स्वप्न साकार होत आहे. याहून जास्त भाग्य ते काय… ? 

बरं आपली सर्वात मोठी प्रशंसक आपली सहचारिणी होणं यातच रणबीरही फार आनंदी असणार यात शंका नाही. 

सध्याच्या घडीला ही जोडी कलाजगत आणि चाहत्यांच्या वर्तुळात कमालीची प्रसिद्धीझोतात आली आहे. आता नजर आहे ती म्हणजे ते केव्हा Mr. And Mrs. Kapoor म्हणून आपल्यासमोर येतात याची… Source link

Leave a Reply