मोठी दुर्घटना, हळदी समारंभात महिला कोसळल्या विहिरीत; 13 जणींचा मृत्यू


कुशीनगर : Women Fell In Well In Kushinagar: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कुशीनगरमध्ये (Kushinagar) एक मोठी दुर्घटना घडली आहे. हळदी समारंभात  (Haldi Ceremony) काही महिला विहिरीत कोसळल्यात. या अपघातात 13 महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईंकाना चार लाखांची मदत देण्यात येणार आहे. 

महिला विहिरीत कशा कोसळल्यात?

हळदीच्या विधीसाठी महिला विहिरीवरील जाळीवर उभ्या होत्या. अचानक विहिरीतील लोखंडी जाळी तुटल्याने महिला विहिरीत पडल्याने शोककळा पसरली. कुशीनगरमधील नेबुआ नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरातील नौरंगिया स्कूल टोला येथे हा भीषण अपघात झाला. 

जखमींना रुग्णालयात केले दाखल

अपघाताची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री योगी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदतकार्य सुरू करण्याचे त्यांना यावेळी निर्देश दिलेत. 

कुशीनगर जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांगितले, विहिरीत पडून महिलांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.Source link

Leave a Reply