मोठा खुलासा: दोन वर्षांपासून संजूबाबा- मान्यतामध्ये दुरावा; पत्नीनं घरच नाही, देशही सोडला


मुंबई : अभिनेता संजय दत्त यानं कायमच माध्यमांशी त्याचं खास नातं जपलं आहे. म्हणूनच की काय त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळतात माध्यमांपासून ते अगदी चाहता वर्गही विचारात पडतो. 

सध्या संजूबाबा कॅमेरासमोर आल्यास तो एकटाच दिसतो, यापूर्वी कायम पत्नी मान्यता किंवा मग दोघांपैकी एक मुल तरी त्याच्यासोबतच दिसत होतं. पण, आता मात्र असं काहीच होताना दिसत नाहीये. कारण, गेल्या 2 वर्षांपासून संजुबाबाची पत्नी त्याच्यासोबत राहतच नाहीये. (Sanjay dutt wife)

बसला ना धक्का? हे ऐकल्यानंतर तुम्हालाही विश्वास बरणार नाही पण हे खरंय की संजुबाबा आणि त्याची पत्नी सध्या एकत्र राहत नाहीत. आता हे सर्व कधी आणि का घडलं? हा प्रश्न पडत असेल तर खाली त्याचंही उत्तर तुम्हाला मिळेल. (sanjay dutt family)

संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता काही वेगळे वगैरे झालेले नाहीत. उलटपक्षी संजुबाबा सतत दुबईला त्याच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असतो. 

पत्नी आणि मुलं दूर असल्याचं सांगत संजय दत्त म्हणाला, ‘मला आनंद आहे की माझी मुलं तिथे राहत आहेत. मान्यतालाही तिथे (दुबईमध्ये) वेळ घालवण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. खरं सांगायचं तर मी जेव्हा इथे कामात व्यग्र नसतो त्यावेळी तिथे कुटुंबासोबतच वेळ व्यतीत करत असतो. 

माझं तिथे येणं-जाणं सुरुच असतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी त्यांच्यासोबत असेल. ते जिथं कुठे असतील तिथं मी जाईन.’ सूत्रांच्या माहितीनुसार कोरोना लॉकडाऊनपासूनच संजुबाबाची पत्नी आणि मुलं दुबईमध्ये राहत आहेत. 

मुलांना दुबईत राहणं आवडतं, त्यांना तिथे शिक्षण घ्यायला आवडतं ज्यामुळं मीसुद्धा त्यांना याची मुभा दिल्याचं म्हणज हा प्रसिद्धीझोतात न येण्यासाठीचा मार्ग वगैरे असं काहीच नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. 

मान्यताही दुबईमध्ये व्यवसाय करत असल्याचं सांगत अगदी कोणताही बेत न आखताच मुलांनाही तिथे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यानं सांगितलं. Source link

Leave a Reply