मोठा धक्का! शाहरुख- गौरीच्या नात्यात दुरावा; ‘ते’ कारणंही समोर


मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्याकडे ‘स्टार कपल’ म्हणून पाहिलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही सर्वाधिक चर्चेत असणारी आणि सतत सर्वांचं लक्ष वेधणारी अशी एक जोडी. शाहरुख आणि गौरीनं खऱ्या अर्थानं एकमेकांना घडताना पाहिलं. शुन्यातून त्यांनी विश्वं उभं केलं असं म्हणायला हरकत नाही. (Shahrukh khan Gauri khan)

1991 मध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकली. ज्यानंतरपासून त्यांच्या नात्याचे बंद आणखी घट्ट झाले. पण, त्याआधी या नात्यात चढ उताराच्या लाटाही आल्या. 

एक वेळ तर अशी आली, जेव्हा त्यांच्या या नात्यात दुरावा आला होता. सूत्रांच्या माहितीनुसार नात्यातील सुरुवातीच्या दिवसांमध्ये असं काही घडलं होतं की शाहरुख आणि गौरी एकमेकांपासून वेगळे झाले होते. 

गौरीच्या मते ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा शाहरुख अगदीच नवखा तरुण होता. लग्नासाठीही तो पूर्णपणे तयार नव्हता. ज्यामुळं गौरीनं या नात्यातून काही काळ काढता पाय घेतला होता.

यामागचं कारण सांगताना गौरी म्हणाली, की शाहरुख तिच्याबद्दल फार संवेदनशील होता. कधीकधी यामुळेच तिला अडचणी येत होत्या. 

गौरीला या नात्यात स्वत:चा वेळ हवा होता. याच कारणामुळे रिलेशनशिपमध्ये सुरुवातीच्या काही दिवसांत तिनं किंग खानपासून दुरावा पत्करला होता. 

वेळ गेला हा दुरावा पुन्हा या दोघांना एकत्र आणून गेला आणि आजतागायत ही जोडी आयुष्यातील वादळांमध्येही एकमेकांची साथ देताना दिसत आहे. Source link

Leave a Reply