Headlines

बार्शी नगर पालिकेच्या वतीने शहरात डास प्रतिबंधक धूर फवारणीला सुरुवात

बार्शी / प्रतिनिधी -पावसाचे दिवस असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढले आहे यातच डासांचे प्रचंड प्रमाण वाढल्याने डासांमुळे अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत. डेंग्यू, मलेरिया, टाईफाईड, चिकन गुणिया या सारख्या आणि इतर जीवघेण्या आजारांपासून नागरिकांना सूरक्षित ठेवण्यासाठी बार्शी नगर पालिकेच्या वतीने आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी अमिता दगडे – पाटील, नगराध्यक्ष अॅड.असिफभाई तांबोळी व आरोग्य सभापती संदेश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये संपुर्ण परिसरात घरोघरी जाऊन डिझेलवर चालणारी व सहज हाताळता येणारी फाॅगिंग मशीन यामध्ये डास प्रतिबंधक औषध न्युआन व किंग फाॅग हे डास प्रतिबंधक औषध मशिनमध्ये वापरुन धुर फवारणी 422 गाडेगाव रोड येथे सुरुवात करण्यात आली.शहरातील प्रत्येक भागात संध्याकाळी 6 नंतर डासांचे प्रमाण जास्त असल्याने डास प्रतिबंधक धुर फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद यांनी दिली.

यावेळी या भागाचे नगरसेवक कय्युम पटेल,शहनाज मूल्ला आरोग्य विभाग प्रमुख शब्बीर वस्ताद,स्वच्छता निरीक्षक हर्षल पवार, नितिन शेंडगे,स्वच्छता शहर समन्वयक गणेश पाटील , पत्रकार गणेश गोडसे, गणेश घोलप,स्वच्छता मुकदम दिपक ओव्होळ, आरोग्य कर्मचारी आदींसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *