Headlines

मनसेचे अध्यक्ष पोहोचले भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या घरी! राज ठाकरे-बावनकुळे यांच्यात नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा? | raj thackeray meets chandrashekhar bawankule in nagpur

[ad_1]

राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून पक्षबांधणीसाठी ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. त्यांनी मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याआधी त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली. दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही राजकीय भेट नसून यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, अशी माहिती दिलेली आहे. असे असले तरी मागली अनेक दिवसांपासून राज ठाकरे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांमध्ये जवळीक वाढलेली आहे. असे असताना राज ठाकरेंनी विदर्भ दौऱ्यारवर असताना बावनकुळे यांची भेट घेतल्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत.

हेही वाचा >>> “…देशातील ८ राज्यांनी,” खरी शिवसेना आणि दसरा मेळाव्यावरून भाजपा खासदाराचे विधान; न्यायालयातील सुनावणीचाही केला उल्लेख

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते मनसेच्या स्थानिक पदाधिकऱ्यांसी संवाद साधत आहेत. तसेच पक्षात स्थानिक पातळीवरील बदल करण्यासाठी मोठे निर्णयही घेत आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. पूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील निवसस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली होती. मागील काही दिवसांपासून भाजपाचे नेते आणि राज ठाकरे यांच्यातील बैठका वाढलेल्या आहेत. राज्यात सत्तांतर झाल्यापासून भाजपा आणि मनसे यांच्यात जवळीक वाढलेली आहे.

हेही वाचा >>> राज ठाकरेंचा मोठा निर्णय! मनसेची नागपूर कार्यकारिणी बरखास्त; नव्या तरुणांना दिली जाणार संधी

दरम्यान, राज ठाकरे यांच्या या भेटीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केलं. राज ठाकरे यांना मी याआधी भेटलो होते. तेव्हा नाजपुरात जेव्हा याल तेव्हा माझ्या घरी चहा घ्यायला या, असे मी त्यांना म्हणालो होतो. त्यामुळे आज ते माझ्याकडे आले आहेत. ही भेट राजकीय नाही. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही. राज ठाकरे यांचा स्वभाव चांगला आहे. ते दिलदार मनाचे आहेत. वैयक्तिक पताळीवर ते मैत्री जपतात त्यामुळे अशा नेत्याशी कोणाचे व्यक्तिगत संबंध असतील तर त्यात काही गैर नाही. राज ठाकरे आणि माझ्यात मागील १८ वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत. त्यांच्याकडे मी जाणे किंवा त्यांनी माझ्याकडे येणे यामध्ये कोणतीही राजकीय बाब नाही, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.

हेही वाचा >>>वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावर राज ठाकरेंचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “कोणी पैसे मागितले…”

मनसेने आपले काम सुरू केले आहे. त्यांचा पक्ष त्यांना वाढवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. भाजपा आपल्या पातळीवर काम करत आहे. ते खुलेआम बोलतात. दिलदारपणे वागतात. प्रत्येक गोष्टीचा राजकीय संबंध लावू नये, असेही बावनकुळे म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *