मनसे नेत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा, अभिनेता अक्षय कुमारच्या बहिणनं केली तक्रार दाखल

[ad_1]

मुंबई : मनसेचे विभागप्रमुख गणेश चुक्कल (MNS leader Ganesh Chukkal) यांच्याविरुद्ध पवई पोलीस ठाण्यात खोटी सही केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर, त्याच्यावर अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) बहीण अलका हिरानंदानीची (Alka Heeranandani) खोटी सही केल्याचा आरोप आहे. अलका यांच्या कंपनीच्या वतीने गणेश चुक्कल यांना 3 वर्षांसाठी फ्लॅट भाड्याने दिला होता. मात्र चुक्कल यांनी खोटे कागदपत्र तयार करून फ्लॅट 30 वर्षांसाठी भाड्याने घेतल्याचं दाखवलं.

गणेश चुक्कल यांच्या विरोधात तक्रार दाखल करत त्यांच्यावर 3 कोटींहून अधिक भाडे थकीत असल्याचे सांगण्यात येत आहे. अक्षयच्या बहिणीच्या कंपनीनं विक्रोळीतील मनसे नेते गणेश चुक्कल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 

आणखी वाचा : ‘हा मुलगा मोठा होऊन….’, Sonam Kapoor च्या मुलाविषयी मोठी भविष्यवाणी आली समोर

विक्रोळी मनसे विभागप्रमुख गणेश चुक्कल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयच्या बहिणीच्या कंपनीने गणेश चुक्कल यांच्या विरोधात हिरानंदानी गार्डन, पवई येथील एका इमारतीतील फ्लॅटच्या कंत्राटाबाबत ही तक्रार दाखल केली आहे. मात्र, गणेश चुक्कल यांनी याप्रकरणी लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. गणेश चुक्कल हे मनसेच्या विक्रोळी विभागाचे प्रमुख आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण पवई हिरानंदानी येथील एका फ्लॅटशी संबंधित आहे.

आणखी वाचा : Kareena Kapoor पासून अनेक प्रसिद्ध अभिनेत्रीचे MMS झाले लीक

गणेश यांच्यावर अलका यांची खोटी सही केल्याचा आरोप आहे. अक्षयच्या बहिणीचा पवईच्या हिरानंदानी भागात एक फ्लॅट आहे, जो गणेश चुक्कलला तीन वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्यात आला होता. भाडे करारानुसार गणेश चुक्कल यांना फ्लॅट रिकामा करायचा होता. मात्र, त्यांनी नकार दिला. यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचलं. या वेळी गणेश यांनी दावा केला की त्यांनी 3 नाही तर 30 वर्षांचा करार केला आहे. मात्र, अलका यांच्या वकिलांनी असा कोणताही करार नसल्याचे म्हटले आहे. ((Akshay Kumar Alka s Company Files Fraud Case Against MNS Leader Ganesh Chukkal For Cheating With Fake Sign)

आणखी वाचा : राखीशी लग्न करण्यावर बॉयफ्रेंड आदिलचा नकार? जाणून घ्या प्रकरण

गणेश यांनी काही संबंधित कागदपत्रं न्यायालयात सादर केली. या संपूर्ण प्रकरणावर अलका यांच्या वकिलांनी ही कागदपत्रं आणि करारावरील सही बनावट असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी पवई आणि वांद्रे पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गणेश यांनी कंपनीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण कोणतीही खोटी कागदपत्रे सादर केलेली नाहीत, आपल्यावरील आरोप खोटे असून ते न्यायालयात सिद्ध होतील, असे गणेश चुक्कल यांनी म्हटले आहे. सध्या अलका यांच्या तक्रारीनंतर पोलीस पुन्हा एकदा गणेश यांची चौकशी करणार आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *