Headlines

mns leader sandeep deshpande meets cm ekanth shinde in varsha over ganpati darshan ssa 97

[ad_1]

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. गणपतीच्या निमित्ताने राज ठाकरे सहकुटुंब वर्षा निवासस्थानी गेले होते. त्यात आता आणखी एका मनसेच्या नेत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतल्याने चर्चांणा उधाण आलं आहे.

मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संदिप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा निवसस्थानी हजेरी लावत, त्यांची भेट घेतली. गणपती दर्शनासाठी ही भेट असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संदिप देशपांडे यांच्यात बराच वेळ चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. संतोष धुरी, शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकरही तेव्हा उपस्थित होते.

हेही वाचा – “दसऱ्याच्या आधी याकूबच्या कबरीला…”, मोहित कंबोज यांचे उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले, हिंदूत्ववादी कधी…”

शिंदे गट-मनसे एकत्र लढणार?

मुंबई महापालिका, ठाणे महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकतो. त्यात मनसे नेत्यांचं ‘वर्षा’वर येणं जाणं वाढलं आहे. गणपती दर्शन हे कारण असलं तरी, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट-मनसे एकत्र लढणार का, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *