mns leader manoj chavan reply ambadas danve over raj thackeray party bjp b team allegation ssa 97महाविकास आघाडी आणि शिवसेनेला राज ठाकरे जाणीवपूर्वक विरोध करत होते. भाजपाचे ते मित्र होऊ पाहत आहेत. त्यांची भाषा, वर्तन भाजपाशी मिळते जुळते आहे. भाजपाचे लोक त्यांना भेटतात. ते भाजपाच्या लोकांकडे जातात. भाजपाची दुसरी शाखा राज ठाकरेंचा पक्ष आहे, अशा टोला विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला होता. त्यावर मनसेने अंबादास दानवेंना प्रत्युत्तर देत खिल्ली उडवली आहे.

“एकदा कावीळ झाली की सगळचं पिवळ दिसतं. अंबादास दानवे बारावे राखीव खेळाडू आहेत, त्यांनी फलंदाजी करावी. शिवसेना राष्ट्रवादीची बी टीम आहे. आपण बी टीम आहे, हे लपवण्यासाठी अन्य पक्षांवर आरोप करण्यात येतात. विरोधी पक्ष नेत्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर बोलावे. अन्य प्रश्नांवर बोलल्यावर मोठं होते, असं त्यांना वाटतं असेल,” असा टोला मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी लगावला आहे.

“राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे शिवसेना घाबरत…”

शिवसेनेच खच्चीकरण करण्यासाठी भाजपाकडून राज ठाकरेंना पुढं केलं जात आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. “सर्व पक्ष राजकीय खेळी खेळत असतात. शिवसेनेनीच फक्त खेळी करायची का? राज ठाकरेंच्या दौऱ्यामुळे शिवसेना घाबरत आहे,” अशी खोचक टीप्पणी मनोज चव्हाण यांनी केली.

“पेडणेकरांचा अर्धवट अभ्यास”

दहीहंडीपासून एक जखमी गोविंदा रुग्णालयात असून, त्याला सरकारी मदत मिळाली नाही, असं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी निदर्शनास आणलं. त्यावर चव्हाण म्हणाले, “पेडणेकर यांचा अभ्यास अर्धवट असतो. अर्धवट अभ्यास करून ते प्रसारमाध्यमांसमोर जातात. संबंधित तरुणाला रुग्णालयातून सोडताना विमा फॉर्म भरून घेतला जातो. त्यानंतर तरुणाला सरकारची मदत मिळेल. रुग्णालयाकडून हलगर्जीपणा होतोय का? हे पाहावे लागणार आहे,” असेही मनोज चव्हाण यांनी स्पष्ट केलं.Source link

Leave a Reply