mns leader gajanan kale criticized shivsena uddhav thackeray on dasara melava issue spb 94राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये कोण घेणार यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकावर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत. अशातच या वादात आता मनसेने उडी घेतली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी दसरा मेळावा वादावरून शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. दसरा मेळाव्याचा उल्लेख टोमणे मेळावा करत मुंबई मनपाने खंजीर, मर्द, मावळा अशा शब्दांपासून होणाऱ्या मनोरंजनाला महाराष्ट्राला वंचित ठेऊ नये, असे म्हणाले.

हेही वाचा – वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णय

दसरा मेळाव्याचा उल्लेख ‘टोमणे मेळावा’

मनसेचे नेते गजानन काळे यांनी दसरा मेळाव्याचा उल्लेख ‘टोमणे मेळावा’ असा करत शिवसेनेला टोला लगावला आहे. ”मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने शिल्लकसेनेच्या टोमणे मेळाव्याला एकदाची काय ती परवानगी देऊन द्यावी. खंजीर, मर्द, मावळा अशा शब्दांपासून होणाऱ्या मनोरंजनाला महाराष्ट्राला वंचित ठेऊ नये. गेल्या अडीच वर्षात ज्या पद्धतीने बारामतीतून भाषणाच्या स्क्रिप्ट येत होत्या. त्याचप्रमाणे यंदाच्या ‘टोमणे मेळाव्या’ची स्क्रिप्टही बारामतीतून येणार आहे”, असा टोला गजानन काळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

”हिंदुत्त्वाला तिलांजली वाहिल्यानंतर शिल्लक सेना अबू आझमी आणि औवेसींना ‘टोमणे मेळाव्या’ला व्यासपीठावर बोलावणार आहे का, असा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे. अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनी या प्रश्नाचं महाराष्ट्राला उत्तर द्यावं”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – …म्हणून फडणवीस शिंदे सरकारच्या कारभारावर नाराज, राष्ट्रवादीचा दावा; भाजपाला दिला सावध राहण्याचा इशारा

शिवसेनेला अद्याप परवानगी नाही

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. त्यामुळेच आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा मजबूत करण्यासाठी शिवाजीपार्कमध्येच दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजीपार्कमध्ये मेळावा घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बीकेसीमधील मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला एमएमआरडीने परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने अद्याप शिवाजी पार्कसंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही.Source link

Leave a Reply