Headlines

mla shahaji patil criticize uddhav thackeray after coming After returning to the constituency in sangola

[ad_1]

काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेमंधी हाय, या वाक्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील महाराष्ट्रभर व्हायरल झाले. हा डायलॉग इतका व्हायरल झाला, की यावर गाणंही बनलं आहे. शहाजी पाटलांच्या या गुणाचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील कौतुक केलं होतं. शिंदे आणि फडणवीसांची सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी आयोजित सत्कार समारंभात काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओके हाय म्हणतं शहाजी बापूंनी डायलॉगबाजी केली.

महाविकास आघाडी सरकारवर निशाणा

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातले वातावरण ढवळून निघाले होते. काल विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले. शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर सगळे बंडखोर आमदार आता आपआपल्या मतदार संघात परतताना दिसत आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील सुद्धा आपल्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी भाषणात शहाजीबापूंनी तुफान डायलॉगबाजी करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरेंवर टीका

अडीच वर्षात उद्धव ठाकरेंसोबत केवळ २ वेळा भेट झाली. ठाकरेंनी एकदाही विकासकामांची विचारणा केली नाही, असा अरोप पाटील यांनी केला. करोना काळात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे घरात बसत होते. मात्र, अजित पवार आढावा घेण्यासाठी सकाळी सहा वाजता बाहेर पडायचे, असंही शहाजी पवार म्हणाले. एवढचं नाही माझ्यासमोर भारतातील लष्कर जरी उभे केले, तरी माझ्यावर दबाब पडणार नाही, असंही मी एकनाथ शिंदेंना सांगितलं असल्याचे शहाजी पवार म्हणाले.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *