Headlines

“मलाही एकनाथ शिंदेंनी फोन केला…” अंबादास दानवेंचा मोठा गौप्यस्फोट | mla ambadas danve alleges eknath shinde called me to join rebel shinde group

[ad_1]

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. या अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिवसेनेच्या खासदारांनीदेखील शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिंदे गटात सामील होण्यासाठी आमदारांना तसेच खासदारांना वेगवेगळ्या मार्गांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनीही मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटात सामील होण्याबाबत विचारणा करण्यासाठी मला फोन कॉल केला होता, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत. ते एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

हेही वाचा >>> Aarey Car Shed : आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील स्थगिती उठवली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना धक्का!

“एखाद्या नेत्याचे कोणावर उपकार असतील तर ते फक्त शिवसेना पक्षाला समोर ठेवून होते. कोणी म्हणेल की, मी तुला खूप मदत केली. मला एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी फोन केला होता. मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, असं मी त्यांना सांगितले. त्यानंतर मी तुला निवडणुकीत मदत केली, असं ते म्हणाले. त्यानंतर उत्तरादाखल तुम्ही मला शिवसेना पक्ष म्हणून मदत केली. उद्धव ठाकरे यांनी सांगितलं म्हणून तुम्ही मला मदत केली, असे मी त्यांना म्हणालो. काही आमदार शिवसैनिकांना सांगतील, मी तुझ्यासाठी हे केलं ते केलं. त्यांना एकच सांगा, की तुम्ही निवडून येण्यासाठी मी काम केलेलं आहे,” असे अंबादास दानवे सभेत बोलताना म्हणाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांच्या भेटीला; चर्चांना उधाण!

दरम्यान, ४० आमदारांपाठोपाठ १२ खासदारांनीदेखील उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला आहे. हे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले असून बंडखोर खासदारांनी गटनेता बदलण्याची केलेली मागणी लोकसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी या बंडखोर खादारांच्या गटाला शिवसेनेचा वेगळा गट म्हणून मान्यता दिली आहे. खासदार राहुल शेवाळे यांना गटनेता म्हणून मान्यता देण्यात आली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *