मंत्री तानाजी सावंत यांच्या वादग्रस्त विधाना-विरोधात बार्शीत निषेध मोर्चा

ना. तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे फलक हातात घेऊन मोर्च्यात सहभागी विविध संघटानांचे कार्यकर्ते

बार्शी / ए.बी.एस न्यूज नेटवर्क – मंत्री तानाजी सावंत यांच्या मराठा आरक्षणाविषयी केलेल्या वादग्रस्त विधान विरोधात आज बार्शी मध्ये विविध सामाजिक संघटनाच्या वतीने निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्च्या मध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.या निषेध मोर्च्यासाठी विद्यार्थी सेना, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना या संघटना सहभागी होत्या.

काय आहे प्रकरण ? – आपल्या कामाऐवजी वक्तव्य आणि विधानांमुळे चर्चेत असणारे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे पुन्हा एकदा अशाच एका कारणामुळे चर्चेत आहेत. रविवारी उस्मानाबादमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सावंत यांची मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य करताना जीभ घसरली.मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात मंत्री तानाजी सावंत यांनी वादग्रस्त विधान केले . त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

हे केल वक्तव्य – तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसंदर्भात बोलताना हे वक्तव्य केले. आता मराठा समाजाकडून आम्हाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दया, अशी मागणी केली जात आहे. या सगळ्याचा कर्ता करविता कोण आहे हे तुम्हा-आम्हाला समजणे गरजेचे आहे. सगळ्यांना याबाबत माहिती आहे, पण कोणी ‘बोलत नाही. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य सावंत यांनी केले.

ना.सावंत यांच्या वक्तव्याचे बार्शीत पडसाद

त्याच्या निषेधार्थ आज बार्शी येथे विद्यार्थी सेना, संभाजी ब्रिगेड, शेतकरी संघटना यांनी बार्शी तहसील कार्यालया समोर मोर्चा काढून मंत्री तानाजी सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी केली.यावेळी विध्यार्थी सेनेचे पांडुरंग घोलप, संभाजी ब्रिगेड चे आनंद काशिद संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष बालाजी डोईफोडे यांच्या सह हरि घाडगे, अनंत व्हळे, किशोर मांजरे, मोहसिन शेख, सुमित नवले उपस्थित होते.

Leave a Reply