‘तुम लोगो ने मेरी बीवी को…’, मिलिंद गवळीला पाहून शेजारी संतापला


मुंबई : ‘आई कुठे काय करते’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मालिकेतील अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. नुकतंच मिलिंदनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंद यांनी त्यांचं घर दाखवलं आहे शिवाय त्यांचं शेजाऱ्यांशी असलेलं खास नात त्यांनी सांगितलं आहे. 

मिलिंदनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत मिलिंदनं त्याच्या शेजाऱ्यांसोबतचे छान फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे मिलिंद या व्हिडिओत गाताना दिसत आहे. मिलिंद ‘ऐ जिंदगी गले लगा  ले’ हे प्रसिद्ध गाणं  गात आहे.  त्याचबरोबर कॅप्शनमध्ये आठवणी शेअर केल्या आहेत. 

बातमीची लिंक : दोन्ही किडनी निकामी, उपचारासाठीही पैसे नाहीत; अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

आणखी वाचा : वैयक्तिक कारणामुळे चर्चेत असणाऱ्या सिद्धार्थ जाधवच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जाणून बसेल धक्का

मिलिंदनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘दोन महिन्यात दोन वर्ष पूर्ण होतील ठाण्याच्या या हार्मनी सिग्नेचर टॉवरमध्ये राहायला येऊन, आई कुठे काय करते शूटिंग ठाण्यात असल्यामुळे इथे ठाण्यात राहणं सोयीचं होतं, या बिल्डिंगमध्ये कोणीच परिचयाचं नव्हतं, मी माणूस घाणी असल्यामुळे माझा कोणाशी परिचय होईल याचीही शक्यता फारच कमी होती, पण एक दिवस आमच्या शेजारचे श्री प्रकाश राव लिफ्ट जवळ मला भेटले, मला बघताक्षणी ते जोरात ओरडले, मला म्हणाले आज मै तुमको छोडूंगा नही, तुम लोगो ने मेरी बीवी को बहुत रुलाया है , मी म्हणालो सर मै तो आपको पहचानता भी नही हुं अरे वो आई कुठे काय करते देखती रहती और रोती रहती है’

आणखी वाचा : ‘माझ्या एका हातात राधिका तर, दुसऱ्या…’, सैफ अली खानचं वक्तव्य चर्चेत

मिलिंद पुढे म्हणाले, ‘मला हात धरून प्रेमाने घरी घेऊन गेले, त्यांच्या पत्नी विद्याताईंची, त्यांचा मुलगा पुनित, सून पल्लवी, नात कियू, सगळ्यांची ओळख करून दिली, एक दिवस passage मध्ये fire Alarm वाजला आणि आम्ही सगळे धावत बाहेर आलो, आमच्या शेजारी राहत असलेली गौरी कदम ती आली आणि म्हणाली सॉरी मी देवासाठी धूप लावत होते त्यामुळे धूर झाला आणि म्हणून fire अलार्म वाजला, प्रकाशराव तिला म्हणाले ‘अच्छा हुआ अलाम बजा उस बहाने से बेटा तुम बहार तो आयी और हमारी पहचान हो गई, मग काही महिन्यांनी गौरीचे आई-वडील श्री अरुण कदम आणि सौ उज्वला ताई इंडोनेशिया वरून आले आणि तेव्हां पासून आत्ता नवरात्रीपर्यंत असा एकही सण गेला नहीं जो धुमधडाक्यात साजरा केला गेला नाही.’

आणखी वाचा : ‘मस्तराम’ मधील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते हैराण, पाहा व्हिडीओ

पुढे मिलिंद म्हणाली, ‘या बिल्डिंगमधल्या असंख्य फॅमिलींची ओळख झाली, उषा आंटी , कविता आंटी , वंदिता, कोमीलाजी सगळ्यांनी मिळून आम्हाला आपलंसं करून घेतलं,आमच्या मजल्यावरती सगळ्यांची दारं सताड उघडी असतात, अरुणजी आणि उज्वला ताईंच्या घरी आठवडा दोन आठवड्यात संगीताची सुरेख मैफिल जमते , त्यांच्यामुळे मला गाण्याची आवड निर्माण झाली आणि आता गाणं शिकायला मी सुरुवात केली, माझ्या एक्टिंगच्या या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये अनेक वर्ष अनेक गावांमध्ये , शहरांमध्ये प्रेमाने आपुलकीनं आपलंस करणारी अनेक माणसं भेटली, पण या ठाण्यात ही माणसं कुटुंबाचा भाग झाली, अशा माणसांमुळे आयुष्याचा हा खडतर प्रवास सोपा वाटायला लागतो, या सगळ्यांचा मी खूप खूप आभारी आहे आणि ऋणी आहे.’Source link

Leave a Reply