Headlines

मध्यरात्री लपूनछपून जान्हवी करत होती असं काम, मैत्रिणीनं पकडताच बदलले तिचे हावभाव

[ad_1]

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या चर्चेत आहे. जान्हवीचा ‘गुड लक जेरी’ हा चित्रपट लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. जान्हवी सध्या तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर जान्हवी सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जान्हवीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान, या व्हिडीओत जान्हवी छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या डायलॉग्सची कॉपी करताना दिसत आहे. 

या व्हिडीओमध्ये जान्हवी मध्यरात्री क्रेविंग होते म्हणून गुपचूप स्ट्रॉबेरी खाताना दिसत आहे. त्याचवेळी तिच्या मैत्रिणीनं तिला रंगेहात पकडले. त्यानंतर दोघांमध्ये संवाद आहे, ‘नागिन 6’ अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची आहे.  तिची मैत्रिणं म्हणते, ‘तू मध्यरात्री चालत आहेस?’ तेव्हा जान्हवी म्हणते, ‘ऐक, मी चालते तेव्हा वेळ दिसत नाही आणि वेळ पाहून कधीच चालत नाही, कारण कोणी पाहिलं तर मला माझी फिगर पाहतात आणि मी माझी फिगर मेनटेन ठवते.’

जान्हवीचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. जान्हवीच्या या व्हिडीओवर एकता कपूर आणि तेजस्वी प्रकाशने देखील कमेंट केली आहे. जान्हवीच्या पोस्टवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांना तिचे एक्सप्रेशन आवडल्याचे सांगितले. 

जान्हवी कपूरची गुड लक जेरी लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 29 जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.  याशिवाय ती ‘बवाल’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात जान्हवी वरुण धवनसोबत दिसणार आहे. जान्हवी दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि पूजा हेगडे यांच्यासोबत ‘जन गण गन’ या चित्रपटातही दिसणार आहे. यानंतर ‘दोस्ताना 2’ या चित्रपटात ती दिसणार आहे. 

जान्हवी कपूरने 2018 साली ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती ‘रुही’, ‘गुंजन सक्सेना’मध्ये दिसली. पाच वर्षांत तिनं केवळ 3 चित्रपटांत काम केले असले तरी प्रत्येक चित्रपटात तिचा अभिनय सुधारताना दिसतो. ‘गुड लक जेरी’च्या ट्रेलरमध्ये तिच्या कामाचे कौतुक होत आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *