MI vs PBKS, IPL 2022 | कॅप्टन रोहित पहिल्या विजयासाठी टीममध्ये करणार मोठे बदल?


मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 23वा सामना (IPL 2022) आज (13 एप्रिल) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या मॅचचं आयोजन हे पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबई या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसऱ्या बाजूला पंजाबचा विजयी पथावर परतण्याचा मानस असेल. (ipl 2022 mi vs pbks mumbai indians captain rohit sharma may be changed in playing eleven against punjab kings)

मुंबईला या मोसमात आतापर्यंत खेळलेल्या चारही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर पंजाबने 4 पैकी 2 वेळा विजय मिळवला आहे. 

कॅप्टन रोहित शर्मा पहिल्या विजयासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करु शकते. मुंबईच्या टॉप ऑर्डरमध्ये कॅप्टन रोहितची भूमिका निर्णायक आहे. मात्र इशान किशन ,सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा यांनाही आणखी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडावी लागेल. 

मुंबईचा डेवाल्ड ब्रेविसला आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. टीमला प्रतिस्पर्धी संघाला मोठं आव्हान द्याचं असेल, तर पहिल्या 3 फलंदाजांना मोठी खेळी करावी लागेल. कायरन पोलार्डचं सातत्याने अपयशी ठरणंही मुंबईसाठी चिंतेची बाब आहे.

पोलार्डमध्ये एकहाती सामना पलटवण्याची क्षमता आहे. पोलार्डने मुंबईला अनेकदा विजय मिळवून दिला आहे. मात्र या मोसमात पोलार्डला आतापर्यंत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे या सामन्यापासून पोलार्डकडून राक्षसी खेळीची अपेक्षा असणार आहे. 

मुंबईसमोर कगिसो रबाडाचं आव्हान

मुंबईच्या फलंदाजांसमोर पंजाबचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचं आव्हान असणार आहे. रबाडासह राहुल चहर, वैभल अरोरा आणि अर्शदीप सिंह यांच्याही गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे.

पंजाब विरुद्धच्या सामन्यासाठी अशी असू शकते मुंबईची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, कीरोन पोलार्ड, फॅबियन एलन, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि बासिल थम्पी.Source link

Leave a Reply