MI vs DC सामन्यादरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; नेटकरी म्हणतायत मुंबईच्या ‘या’ खेळाडूची गर्लफ्रेंड

[ad_1]

मुंबई : आयपीएल सामन्यादरम्यान अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन तरूणी दिसतायत. या तरूणीपैकी एकीचं नाव मुंबईतल्या एका खेळाडूसोबत जोडले जात आहे. या खेळाडूने सामन्यात तूफान बॅटींग करून मुंबईला विजय मिळवून दिला होता. 

दिल्लीने मुंबईला 159 धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा मुंबईने यशस्वीरीत्या पाठलाग करत 5 विकेटसने आणि 5 बॉल राखून विजय मिळवला. या सामन्या दरम्यानचा एका ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या  ‘मिस्ट्री गर्ल’चे नाव  आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा फलंदाजाशी जोडले जातेय.  

ईशान किशनची गर्लफ्रेंड? 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या ‘मिस्ट्री गर्ल’च नाव अदिती हुंडिया आहे.अदितीला अनेक आयपीएलच्या सामन्यांमध्ये पाहिले गेले आहे. इशान किशन दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धावा करत असताना अदिती हुंडिया आणि तिच्या मैत्रिणीला स्क्रीनवर दाखवण्यात आले. अदिती हुंडिया ही ईशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचे नेटकरी बोलतायत.

ईशान किशन आणि अदिती हुंडिया नेहमीच एकत्र फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा नेहमीच सोशल मीडियावर रंगते. नेटकऱ्यांनी आदिती हुंडियाला ईशान किशनची लकी चार्म म्हटलेय.  त्यामुळे आता ही मिस्ट्री गर्ल कोण आहे ? याबाबत सोशल मीडियावर उत्सुकता वाढली आहे.

कोण आहे ‘मिस्ट्री गर्ल’ ? 

अदिती हुंडिया ही एक फॅशन-मॉडेल आहे. अदिती 2017 च्या मिस इंडिया स्पर्धेची फायनलिस्ट राहिली आहे. 2018 मध्ये तिने मिस सुपरनॅशनल इंडियाचा किताबही जिंकला होता. आदिती हुंडिया शनिवारी तिची मैत्रिण काशिका कपूरसोबत सामना पाहण्यासाठी आली होती. काशिका कपूर ही देखील एक मॉडेल आहे, जिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *