‘मी रात्री झोपेतून उठून…’, अभिनेत्या सोबतच्या ‘त्या’ kissing scene मुळे रश्मिका ट्रोल


Rashmika Mandanna On Kiss Scene:  ‘पुष्पा: द राइज’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे. रश्मिका लवकरच महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्ता स्टारर ‘गुड बाय’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाच्या यशासाठी अभिनेत्री जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. महत्त्वाच म्हणजे अभिनेत्री फक्त प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असते.

आज यशाच्या उच्च शिखरावर असलेली अभिनेत्री एकेकाळी ट्रोलींगमुळे चर्चेत आली. रश्मिका सध्या बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याव्यतिरिक्त अभिनेता विजय देवरकोंडासोबत डेटिंग केल्यामुळे चर्चेत आहे. 

नुकतेच रश्मिकाने मुलाखती दरम्यान एका मोठ्या गोष्टीचा खुसाला केला. एक काळ होता जेव्हा एका किसिंग सिनमुळे रश्मिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 

2019 मधील ‘कॉम्रेड’ सिनेमात, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्यातील किसिंग सीन दाखवण्यात आले होते. तेव्हा लोकांनी अश्लील आणि प्रसिद्धीसाठी भुकेली असल्याचं म्हणत अभिनेत्रीला ट्रोल केलं. 

जीवनातील ते क्षण आठवत अभिनेत्री म्हणाली, ‘ट्रोलिंगचा सामना मला अनेक महिने करावा लागला. याकाळत मी अनेक नकारात्मक गोष्टी ऐकल्या, बातम्या वाचल्या. मला अशी स्वप्ने पडत होती जिथे सर्वांनी माझ्याकडे पाठ फिरवली आहे आणि मी सतत त्यांची मदत मागत आहात.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी रात्री झोपेतून उठून रडत होती. पण माझ्या कुटुंबाला मी काहीही सांगितलं नाही. कारण कुटुंबासाठी सर्वकाही नवीन होतं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. 

रश्मिकाचे आगामी सिनेमे (rashmika mandanna upcoming movies)
रश्मिका लवकरचं अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ अभिनेता टायगर श्रॉफसोबत ‘रॅम्बो’ सिनेमात दिसणार आहे. त्याचबरोबर सध्या अभिनेत्री ‘गुडबाय’ आणि ‘अॅनिमल’ सिनेमांमुळे चर्चेत आहे.Source link

Leave a Reply