Headlines

“म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा” आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरून गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका! | BJP leader Gopichand padalkar on aaditya thackeray maharashtra visit rmm 97

[ad_1]

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. आमदारानंतर अनेक खासदार आणि पदाधिकारीदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर गेले आहेत. विविध मतदारसंघात जाऊन आदित्य ठाकरे शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी होताना दिसत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी बोचरी टीका केली आहे. शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उरलेली शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था या महाविकास आघाडीची झाली आहे, अशी बोचरी टीका पडळकरांनी केली आहे. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- “ही आमची क्रूर चेष्टा” पीएम मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदींचं महागाईविरोधात आंदोलन

यावेळी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याविषयी विचारलं असता, पडळकर म्हणाले की, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आता एकत्र आले आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला राष्ट्रवादीवाले, काँग्रेसवाले आणि शिवसेनेवाले थोडे-थोडे लोक पाठवत आहेत. परवाच एका कुठल्यातरी इलेक्ट्रॉनिक मीडियावर महाराष्ट्राचं एक सर्वेक्षण आलं होतं. सध्याच्या घडीला राज्यात निवडणूक झाली तर नेमकं काय होईल? यावर सर्वेक्षण घेतलं होतं.

हेही वाचा- “ते अमेरिकेतूनही समर्थन फॉर्म भरून घेतील” आदित्य ठाकरेंची शिंदे गटावर बोचरी टीका!

या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रात आता निवडणूक झाली तर शिवसेनेचे १८ आमदार निवडून येतील आणि दोन किंवा तीन खासदार निवडून येतील, असं दाखवलं. त्यामुळे आदित्य ठाकरेंचा दौरा इतकाच झंझावत असेल तर पोलमध्ये काहीतरी दिसायला हवं होतं. पण “म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा” अशी परिस्थिती या तिन्ही पक्षांची झाली आहे. त्यामुळे ते एकमेकांना सांभाळून घेत आहेत, अशी बोचरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *