Headlines

Met Gala 2022 : शापित सौंदर्यवतीच्या 60 वर्षे जुन्या गाऊनमध्ये Kim Kardashian ची ग्रँड एंट्री

[ad_1]

मुंबई : भारतीयांच्या सोशल मीडिया फिडवर मंगळवारी सकाळी काही रंजक पोस्ट सर्वांनीच पाहिल्या. या पोस्ट होत्या Met Gala 2022 मधील रेड कार्पेट इव्हेंटच्या. मेट गाला म्हटलं की, जगभरातील सर्वच मनोरंजन विश्वांतून या कार्यक्रामाच्या बाबतीत कुतूहलाची भावना पाहायला मिळते. 

त्यातही काही सेलिब्रिटी या सोहळ्यासाठी नेमके कोणत्या लूकमध्ये येणार याचीच उत्सुकता सर्वांना असते. यातलंच एक नाव म्हणजे, किम कार्दशियन. यंदाच्या वर्षी किमय मेट गाला सोहळ्यासाठी एका खास लूकमध्ये आली. (Kim Kardashian )

तिचा हा लूक खास असण्यामागचं कारण ठरलं तो म्हणजे तिनं निवडेलेला ड्रेस. मर्लिन रेड कार्पेटवर आली आणि जणू तिच्या अवतीभोवती असणारं सर्वकाही क्षणार्धासाठी थांबलं. 

कारण, सर्वत्र तिच्याच रुपाची चर्चा होती. पाहणाऱ्या प्रत्येकाचं मन तिच्यापुढं लोळण घालत होतं. किमनं यंदाच्या वर्षी जवळपास 60 वर्षे जुना गाऊन निवडला होता. 

हा गाऊन अतिशय खास असण्यामागचं कारण म्हणजे, तो हॉलिवूड अभिनेत्री आणि खासगी आयुष्यातील संघर्षमय काळामुळं शापित सौंदर्यवती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मर्लिन मन्रोंचा होता. 

खुद्द किमनंच तिच्या पोस्टच्या माध्यमातून तिच्या या लूकची माहिती दिली. ‘1962 मध्ये राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं Happy Birthday हे गाणं गाण्यासाठी मर्लिन मन्रोनं घातलेल्या या अद्वितीय ड्रेसला परिधान करण्याची संधी मला मिळणं ही मोठी बाब आहे. (Marilyn Monroe )

हा एक अप्रतिम स्कीनफिट गाऊन आहे, ज्यावर कॉस्च्युमर जीन लुईस यांनी 6 हजार खडे हातशिवणानं लावले होते’, असं तिनं लिहिलं. 

मर्लिन मन्रो यांनी परिधान केल्यानंतर पहिल्यांदाच हा ड्रेस कोणा दुसऱ्या व्यक्तीनं घातला आणि ती व्यक्ती म्हणजे किम कार्दशियन. या क्षणासाठी तिनं ज्यांनी तिला मदत केली त्या सर्वांचे आभार मानले. (Marilyn Monroe john kenedy)

किम या सोहळ्यासाठी तिचा प्रियकर Pete Davidson याच्यासोबत आली होती. रेड कार्पेटवर इतरही सेलिब्रिटी यावेळी आल्या. पण, किमनं मात्र तिच्या या वेगळेपण सिद्ध केलं होतं. 

या ऐतिहासिक ड्रेसमध्ये फिट होण्यासाठी म्हणून किमनं 21 दिवसांमध्ये तिचं वजन नियंत्रणात आणलं. या ड्रेसची सध्याची किंमत 36 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं म्हटलं जात आहे. किमच्या या लूककडे पाहून तुम्हाला काय वाटतं? 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *