‘मी तिच्यावर कधीच…’; मलायकाशी नातं तुटण्याबाबत अरबाज खरंच असं म्हणाला?


Arbaaz Khan Malaika Arora Divorce Reason: अभिनेता अरबाज़ खान (Arbaaz Khan) आणि अभिनेत्री, मलायका अरोरा (Malaika Arora) यांचं वैवाहिक नातं केव्हाच संपुष्टात आलं असलं तरीही त्यांचं नातं सातत्यानं चर्चेत येताना दिसत आहे. एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी ही सेलिब्रिटी जोडी 1998 मध्ये विवाहबद्ध झाली होती. पण, 19 वर्षांच्या सहजीवनानंतर मात्र त्यांच्या नात्यात मीठाचा खडा पडला. (Bollywood Actor arbaaz khan ex wife Malaika Arora Divorce Reason)

2017 मध्ये अरबाज आणि मलायकानं नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या घटस्फोटाचं स्पष्ट असं कारण आजही समोर आलेलं नाही. पण जुन्या मुलाखतींच्या माध्यमातून मात्र हे नातं नेमकं कसं होतं याचं चित्र मात्र सर्वांसमोरच उलगडलं होतं. 

अरबाजनं एका मुलाखतीत सांगितल्यानुसार त्याच्या करिअरमध्ये मलायकानं बरीच मदत केली होती. लहानपणापासूनच मिळालेल्या शिकवणीनुसार अरबाजनं कधीच मलायकाला कोणत्या कामाच्या बाबतीत थांबवलं नाही. 

‘मी तिच्यावर कधीही कोणत्याही गोष्टीसाठी बंधन घातलं नाही’ असं म्हणत असं केलं असतं तर तिनंही मला तशीच वागणूक दिली असती असं तो बोलला होता. 

अरबाजची ही जुनी मुलाखत आणि त्याचं वक्तव्य पाहता या जोडीनं अतिशय परिपक्वतेनंच निर्णय घेत एकमेकांच्या खासगी आयुष्याला पूर्णपणे सन्मान दिल्याचं पाहायला मिळालं. 

सध्या मलायका अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करत आहे. तर, अरबाजही इटालियन मॉडेल जॉर्जिया आंद्रीयानी हिला डेट करत आहे. मुलगा अरहानमुळं ही जोडी काही क्षणांना एकत्रही दिसते. थोडक्यात काही औपचारिक गोष्टींपुरताच त्यांचा काय तो आमनासामना होतो.Source link

Leave a Reply