मी तुझा खूप मोठा फॅन आहे, पण…; रोहित शर्माच्या भावनिक ट्विटवर चाहत्याचा रिप्लाय


मुंबई : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमची कामगिरी फारच निराशाजनक आहे. मुंबईने आतापर्यंत 8 सामने खेळले असून एकाही सामन्यांत त्यांना विजय मिळवता आलेला नाही. रविवारी लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबईच्या प्लेऑफबाबत होत्या नव्हत्या तेवढ्या सर्व आशा मावळल्या. यानंतर आता रोहित शर्माने एक ट्विट केलं असून यावेळी तो फार भावूक असल्याचं दिसून आलं आहे.

रोहितच्या भावनिक ट्विटनंतर रोहित शर्मा मुंबईच्या टीमचं कर्णधारपद सोडणार का अशा चर्चा रंगल्या आहेत. अशातच अनेक चाहत्यांनी रोहितला पाठिंबा दर्शवत आम्ही तुझ्या सोबत असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी एका युझरने, काहीही झालं तरीही मुंबईला सपोर्ट करणार असल्याचं ट्विट केलं आहे. तर दुसऱ्या एका युझरने म्हटलंय की, काहीच प्रॉब्लेम नाही रोहित, आम्ही तुमच्या नेहमी सोबत आहोत. 

रोहित शर्माने भावनिक ट्विट केल्यानंतर ते काहीवेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालं. यावेळी काही चाहत्यांनी, रोहित तुला बाकीच्या सामन्यांसाठी ऑल द बेस्ट. पूर्ण जोशात कमबॅक करा, असं म्हटलंय. शिवाय काहीही झालं तरी आमचं तुझ्यावर प्रेम आहे. शेवटपर्यंत आम्ही तुला सपोर्ट करू, असंही चाहत्यांचं म्हणणं आहे.

यावेळी, रोहित मी तुझा खूप मोठा फॅन आहे. पण एकदा अर्जुन तेंडुलकरला संधी दे. सर्वांना त्याचा परफॉर्मन्स पाहण्याची इच्छा आहे, अशी मागणीही एकाने सोशल मीडियावर केली आहे.

पाचवेळा आयपीएलचं जेतेपद जिंकणारी मुंबई इंडियन्स यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडली आहे. सलग 8 सामन्यात पराभव स्विकारल्यानंतर मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत मुंबईच्या टीमवर आणि कर्णधार रोहित शर्मावर सोशल मीडियावरून टीका करण्यात येतेय. Source link

Leave a Reply