Headlines

मविआ सरकारची शेवटची मंत्रीमंडळ बैठक बेकायदेशीर, औरंगाबादच्या नामकरणाचा निर्णय उद्या- एकनाथ शिंदे | eknath shinde announced renaming decision of aurangabad city will takes place in tomorrow cabinet meeting

[ad_1]

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. शिंदे सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे आणि भाजपाला लक्ष्य केले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर औरंगजेब तुमचा अचानक नातेवाईक कसा झाला? असा खोचक सवाल करत सकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने ज्या मंत्रीमंडळ बैठकीत हा निर्णय घेतला ती बैठकच अवैध होती. त्यामुळे उद्या (१६ जुलै) मंत्रीमंडळ बैठकीत रितसर निर्णय घेण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. ते मुंबईत एका सभेत बोलत होते.

हेही वाचा >>> औरंगाबादचे संभाजीनगर होणारच! नामांतराला स्थगिती नाही; फडणवीसांनी केलं स्पष्ट

“आम्ही उद्या सकाळी अधिकृत मंत्रिमंडळ बैठक घेऊन औरंगाबादचे संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करणार आहोत. महाविकास आघाडीच्या सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेण्याचा अधिकार नव्हता, असे उद्या कोणीही म्हणू शकते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जो निर्णय घेण्यात आला, तो अवैध ठरला असता. संभाजीनगर हे बाळासाहेब यांच्या मुखातून निघालेले नाव आहे,” असे म्हणत शहरांच्या नामकरणाच्या प्रस्तावाला उद्या मंजुरी देण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“…तर मी राजकारण सोडून निघून जाईन,” आगामी विधानसभा निवडणुकीवर बोलताना एकानाथ शिंदेंचे थेट आव्हान

तसेच, “आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेतली तेव्हा औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. ही शेवटची मंत्रीमंडळ बैठक बेकायदेशीर आहे. आम्ही राज्यपालांना संख्याबळ असल्याचं पत्र दिलं होतं. जेव्हा सरकार अल्पमतात असतं तेव्हा कुठलीही मंत्रीमंडळ बैठक घेता येत नाही. परंतु शेवटच्या मंत्रीमंडळात २०० ते ३०० शासन निर्णय घेण्यात आले. यामध्ये औरंगाबाद शहराचं संभाजीनगर नामकरण तसेच उस्मानाबादचे धाराशिव नाव करण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. ही मंत्रीमंडळ बैठक बेकायदेशीर होती,” असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *