Mauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना ‘या’ मंत्राचा करा जप


Mauni Amavasya 2023 : नवीन वर्ष सुरु होऊन आता 20 दिवस उलटून गेले आहेत. आज या वर्षातील पहिली अमावस्या आहे. माघ महिन्याची ही मौनी अमावस्या त्यातच ही शनिवारी आल्यामुळे शनिश्चरी अमावस्या…काही दिवसांपूर्वी शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे शनिदेव आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी ही अमावस्या खास आहे. आजच्या दिवशी शास्त्रानुसार स्नान आणि दान केल्याने अक्षय पुण्य लाभ मिळतो. शिवाय आपण पापमुक्त होण्यासाठी या अमावस्याला हे काम नक्की करा. स्नान आणि दान करण्याची वेळ आणि मंत्र आणि योग्य पद्धत जाणून घेऊया. (Shani Amavasya January 2023 Mauni Amavasya 2023 snan daan mantra and shubh muhurat for sin removed marathi news)

मौनी अमावस्या 2023 स्नान मुहूर्त (Mauni Amavasya 2023 Snan Muhurat)

पंचांगानुसार, माघ महिन्याच्या मौनी अमावस्याला सकाळी 08.34 ते 09.53 पर्यंत स्नान करण्याचा शुभ मुहूर्त सांगण्यात आला आहे. 

मौनी अमावस्या 2023 स्नान मंत्र (Mauni Amavasya Snan Mantra)

हिंदू धर्मात स्नानला विशेष महत्त्व आहे.  मौनी अमावस्याला पहाटे उठून स्नान केल्यास आपण पापमुक्त होतो, असं शास्त्रात सांगितलं आहे. अमावस्येला सर्व पवित्र नद्या आणि गंगा यांच पाणी हे अमृतसारखं होतं, धार्मिक ग्रंथात सांगण्यात आलं आहे. जर तुम्हाला तीर्थस्नान करता येतं नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गेंगेचं पाणी मिसळून स्नान करावे. स्नान करताना ॐ नमो गंगायै विश्वरूपिण्यै नारायण्यै नमो नमः या विशेष मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्यामुळे मुनष्याला अश्वमेध यज्ञाप्रमाणेच फळ मिळतं. 

अमावस्या स्नान मंत्र – गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु।।

‘या’ गोष्टी दान करा! (Mauni Amavasya Upay)

या अमावस्येला गरीबांना चुकूनही पैशांच दान करु नका. आजच्या दिवशी काळे तिळ, अन्न, वस्त्र, मोहरीचे तेल आणि लोखंड दान करा.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply