मरवडे गावच्या मास्तरला ओपन चॅलेंजभविष्यात होणाऱ्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू -संजय चेळेकर

मारापुर /प्रतिनिधी – दामाजी पतसंस्थेच्या निवडणुकीत गुरुसेवा पॅनल विश्वासहर्ता जपल्याने सुज्ञ मतदार राजाने संस्थेच्या हिताचा निर्णय घेऊन प्रचंड मताधिक्याने सत्ता अबाधित ठेवली, मात्र विरोधकांनी काही शिक्षकांच्या नाराजीचा फायदा घेऊन स्वार्थापोटी निवडणूक लावण्याचे महापाप केले, दामाजी पतसंस्थेच्या विजयाने शिक्षकाच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे, मरवडे गावच्या मास्तरला ओपन चॅलेंज भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत टप्प्यात आणून करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन संजय चेळेकर यांनी बोलताना व्यक्त केले.


मरवडे येथे भाजपाच्यावतीने भाजपा तालुका उपाध्यक्ष श्रीकांत गणपाटील, माजी सरपंच नितीन घुले यांच्या पुढाकाराने दामाजी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित नूतन संचालक मंडळाचा जंगी सत्कार सोहळा पार पडला, याप्रसंगी पॅनलचे मार्गदर्शक संजय चेळेकर बोलत होते.
चेळेकर पुढे म्हणाले,दामाजी पतसंस्था ही शिक्षक संघाच्या सभासदांची संस्था आहे,गेल्या सोळा वर्षात या संस्थेची निवडणूक कधी झाली नाही,बिनविरोध परंपरा असताना, जिल्हा प्राथमिक शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी ही निवडणूक लावण्याचे काम येथील एका शिक्षकाने केले, यापुढील काळात शिक्षकाच्या राजकारणात सर्व गट एकत्र आले असून,ज्या शिक्षकाला हातात खडू धरण्याची अलर्जी आहे,त्या मास्तरला मरवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत धडा शिकविला आहे, याच धर्तीवर भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकित टप्प्यात आणून मास्तरचा करेक्ट कार्यक्रम करू असे ओपन चॅलेंज देत दामाजी पतसंस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नूतन संचालक मंडळांचे चेळेकर यांनी कौतुक केले, कामच कामाचा गुरू या धरतीवर दामाजी पतसंस्था स्वच्छ व पारदर्शक कारभार करेल असा विश्वास त्यांनी बोलताना व्यक्त केला.


या सत्कार कार्यक्रमास पॅनलचे मार्गदर्शक लक्ष्मण घुले,भारत मासाळ, सिताराम फटे, दत्तात्रय येडवे, यांच्यासह प्राचार्य राजाराम पोतदार, माजी उपसरपंच रजाकभाई मुजावर, माजी सरपंच जगन्नाथ मासाळ, रतिलाल केंगार, संजय सूर्यवंशी, दामोदर घुले, अमोल जाधव,पांडुरंग मासाळ, सोमनाथ टोमके, सुधाकर पाटील,सिद्धेश्वर जाधव, शिवानंद कोळी,दत्तात्रय मासाळ, विशाल गायकवाड, मारुती दवले, चंद्रकांत गोरे, नानासाहेब जाधव,विलास जाधव, दत्तात्रय वाघ, वसंत जाधव,शिवाजी गायकवाड, अमित डांगे,बापू जाधव,राहुल घुले,विशाल कुंभार,यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


गुरुसेवा पॅनलचे विजयी उमेदवार -आसबे विष्णू,गणपाटील शिवाजी, जाधव धर्मराज,जगदाळे धनाजी,नागणे धनाजी ,तानगावडे,संभाजी ,यादव प्रदीप,
महिला प्रतिनधी-,भिंगे अनिता,काकडे सुनिता ,
कांबळे रावजी यांच्यासह पॅनलचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी शिवाजी गणपाटील,दत्तात्रय येडवे, लक्षमण घुले,नितीन घुले, श्रीकांत गणपाटील,आदींनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन घुले तर आभार दामोदर घुले यांनी मानले.

Leave a Reply