Headlines

शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिनानिम्मित चर्चासत्राचे आयोजन

बार्शी / प्रतिनिधी – भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक कामगार केंद्राच्या वतीने शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृती दिनाच्या निमित्ताने तसेच दलित पँथरचे सुवर्णमहोत्सवी वर्ष या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संयुक्त पणाने दिनांक 20 फेब्रुवारी 2022 वार रविवार रोजी आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे दुपारी ठीक 3 वाजता होणार आहे.

यानिमित्ताने होणाऱ्या चर्चासत्रात प्रा. शंकर अंकुश, परांडा, प्रा. डॉ. दत्ता घोलप, सोलापूर विद्यापीठ, कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोंबरे, कम्युनिस्ट पक्ष राज्य कार्यकारणी सदस्य हे; तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई धनंजय उद्धवराव पाटील, शेकाप नेते उस्मानाबाद हे चर्चा सत्रात भाग घेणार आहेत.बार्शीतील नागरिक, कामगार, विद्यार्थी, युवक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, नेते यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे अहावण प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *