विवाहित पुरुषाच्या प्रेमात होत्या नर्गिस, नात्यानं दाखवला सर्वात वेदनादायी दिवस


मुंबई : हिंदी चित्रपट जगतामध्ये काही कलाकारांच्या योगदानाची तुलना कशासोबतच केली जाणार नाही. अशा कलाकारांमध्ये येणारी आणि सातत्यानं चर्चेत आलेली नावं म्हणजे नर्गिस, राज कपूर. (Raj Kapoor Nargis Relationship)

राज कपूर यांच्या बऱ्याच चित्रपटांमध्ये नर्गिस या मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकल्या. पहिल्या भेटीपासूनच राज कपूर यांच्या मनात नर्गिस यांनी घर केलं होतं. पुढे चित्रपटांच्या निमित्तानं त्यांची मैत्री घट्ट झाली आणि या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 

राज कपूर आपल्याशी एक ना एक दिवस लग्न करुन संसार थाटतील अशी आशा नर्गिस मनोमनी बाळगू लागल्या. पण, ते विवाहित होते. पत्नीवर त्यांचं अफाट प्रेमही होतं. पत्नी आपल्या मुलांची आई आहे आणि नर्गिस सिनेमांची असं ते कायम म्हणत असत. 

अशातच एक दिवस असा आला, जेव्हा नर्गिस आणि शो मॅन राज कपूर सुट्ट्यांसाठी बाहेर जाण्याचा बेत आखत होते. बाहेर जाण्यासाठी म्हणून नर्गिस राज यांची वाट पाहत राहिल्या. पण, बरात वेळ झाला तरीही ते आले नाहीत म्हणून त्यांनी तडक त्यांचं घर गाठलं. 

तिथं गेल्यावर नर्गिस यांच्या लक्षात आलं की इथं एक पार्टी सुरु आहे. राज कपूर त्यांना तिथं कुठेच दिसले नाहीत. शेवटी त्या त्यांच्या बेडरुममध्ये गेल्या. 

दार न ठोठावताच नर्गिस आत गेल्या आणि पाहतात तर काय, राज कपूर पत्नीसोबत वेळ व्यतीत करत होते, तिच्या गळ्यात हार घालत होते. हे पाहताच नर्गिस शांतपणे खोलीतून बाहेर आल्या. त्या क्षणापासून त्यांनी राज कपूर यांच्याशी असणारी सर्व नाती तोडण्याचा निर्धार केला. 

त्या दिवसानंतर नर्गिस राज कपूर यांना केव्हाही भेटल्या नाहीत. पुढे काही वर्षांनी त्यांच्या जीवनात सुनील दत्त यांची एंट्री झाली आणि ही जोडी कालांतरानं विवाहबंधनात अडकली. Source link

Leave a Reply