Married Life Palmistry : ‘या’ रेषा असलेल्यांना वैवाहिक सुख मिळणं कठीण


मुंबई : हस्तरेषा शास्त्रानुसार हाताच्या रेषांवरून व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक पैलू जाणून घेता येतात. हाताच्या रेषांवरूनही तुम्ही वैवाहिक जीवनाबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. अनेकवेळा असं घडतं की, लग्न झाल्यानंतरही माणसाच्या आयुष्यात चढ-उतार येतात. 

पुरुषाच्या हातात हृदयाची रेषा आणि शिररेषा सारखीच असेल आणि स्त्रीच्या हातात हृदयाची रेषा आणि मस्तकरेषा वेगळी असेल तर पती-पत्नीमध्ये वैचारिक फरक असतो. चला जाणून घेऊया हस्तरेषेनुसार राशीच्या लोकांना वैवाहिक सुख कसं प्राप्त होत नाही.

स्त्रीचा हात जर कडक असेल

हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्या स्त्रीचा हात कठोर आणि पतीचा हात मऊ असेल तर स्त्रीच्या स्वभावामुळे वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. एखाद्याच्या लग्नाची रेषा समोरून कापली जात असेल तर वैवाहिक जीवनात अडथळा येतो.

हृदय रेषा कट होत असेल तर

स्त्रीच्या हातातील हृदयाची रेषा कापली जात असे तर अशा स्त्रियांना अगदी छोट्या छोट्या मोठ्या वाटू लागतात. पतीचं थोडेसं दुर्लक्ष त्यांना सहन होत नाही. त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद कमी राहतो.

भाग्य रेषेवर बेटांचं चिन्ह

हस्तरेषा शास्त्रानुसार, जर एखाद्याचा हात कठोर असेल आणि भाग्य रेषेवर बेटाचं चिन्ह असेल आणि मस्तिष्क रेषा थोडी लहरी असेल तर अशा व्यक्तीच्या जीवनात वैवाहिक सुख कमी असतं.

(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)Source link

Leave a Reply