Marriage | अविवाहितांसाठी खुशखबर; नवीन वर्षात लग्नाचे भरपूर मुहूर्त


मुंबई : नुकताच गुढीपाडवा आपण साजरा केला. चैत्र प्रतिपदेपासून ते फाल्गुन अमावस्यापर्यंत प्राचीन भारतीय वार्षिक कालगणना आहे. नुकतेच नवीन वर्ष सुरू झाले आहे. या नववर्षात विवाहाचे 89 मुहूर्त आहेत. या मुहूर्तांमध्येही शुद्ध शास्त्रानुसार 62 तर चातुर्मास काळातील आपत्कालीन 27 असे एकूण 89 मुहूर्त काढण्यात आले आहे. 

हिंदू धर्मियांच्या मान्यतेनुसार, व्यक्तींच्या आयुष्यात चार आश्रम असतात. ते म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आणि संन्यास होय. यातील ब्रह्मचर्य आश्रमातील उपनयन म्हणजे मुंज हा संस्कार महत्वाचा मानला जात आहे. या संस्काराचे 47 मुहूर्त आहेत. चला तर या वर्षी कोणत्या दिवशी विवाहाचे मुहूर्त आहेत. त्याबाबत माहिती घेऊ.

शुद्ध शास्त्रानुसार योग्य विवाह मुहूर्त 

चैत्र ते आषाढ महिन्यातील मुहूर्त (२०२२)
एप्रिल – १५, १७, २१, २४, २५ (पाच दिवस)
मे – ४, १०, १३, १४, १६, १८, २०, २१, २२, २५, २६, २७ (१२ दिवस)
जून – १, ६, ८, १०, १३, १४, १४, १६, १८ (नऊ दिवस)
जुलै – ३, ५, ६, ७, ८, ९ (सहा दिवस)

मार्गशीर्ष ते फाल्गुन महिन्यातील मुहूर्त

(तुळशी विवाहानंतर २०२२-२३)
– नोव्हेंबर – २५, २६, २८, २९ (चार दिवस)
– डिसेंबर – २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८ (आठ दिवस)
– जानेवारी – १८, २६, २७, ३१  (चार दिवस)
– फेब्रुवारी – ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८ (१० दिवस)
– मार्च – ९, १३, १७, १८ (चार दिवस)

चातुर्मासातील  आपत्कालीन विवाह मुहूर्त

आषाढ ते कार्तिक (२०२२)
जुलै – १४, १५, ३१ (तीन दिवस)
ऑगस्ट – ३, ४, ७, ९, १०, १५, १६, २०, 
२१, २९ (१० दिवस)
सप्टेंबर – ७, ८, २७, ३० (चार दिवस)
ऑक्टोबर – ६, ९, १०, ११, २१, ३१ (सहा दिवस)
नोव्हेंबर – ५, ६, १०, १७ (चार दिवस)

गौणकाळातील व चातुर्मास काळातील मुहूर्त (२०२२)

 जुलै – १, ४, १५, १८ (चार दिवस)
 ऑगस्ट – ३, ७, १४, १६, २९ (पाच दिवस)
 सप्टेंबर – ६, २७, ३० (तीन दिवस)
 ऑक्टोबर – ५, ११, ३० (तीन दिवस)
 नोव्हेंबर – ३, १३, १४, २८ (चार दिवस)
 डिसेंबर – २, ४, २७ (तीन दिवस)
 जानेवारी – १, ९, १२ (तीन दिवस)

उपनयन संस्कार (मुंज)

मुख्य काळातील मुहूर्त (२०२२-२३)
एप्रिल – ३, ६, ११, १३, २१ (पाच दिवस)
मे – ५, ६, ११, १८, २० (पाच दिवस)
जून – १, ६, १६ (तीन दिवस)
जानेवारी – २६, ३१ (दोन दिवस)
फेब्रुवारी – ८, १०, २२, २४ (चार दिवस)
मार्च – १, ३, ९ (तीन दिवस)Source link

Leave a Reply