मराठमोळ्या अभिनेत्रीनं गोव्यात घेतलं आलिशान घर…


Tejasswi Prakash New Video: आजकाल अनेक नामवंत सेलिब्रेटी आपली स्वप्नं पुर्ण करताना दिसत आहेत. आलिशान गाडी, घर घेताना दिसत आहेत. सिनेसृष्टीतल्या अशाच एका अभिनेत्रीनं आपलंही असंच एक स्वप्नं पुर्ण केलं आहे. गोव्यासारख्या पॉश ठिकाणी तिनं घर खरेदी केलं असून सध्या तिचा नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (big boss fame actress tejaswi prakash buys house in goa video goes viral boyfriend karan kundra comments)

टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्या (Tejasswi Prakash and Karan Kundra) अफेअरबद्दल आता कसलेच गुपित राहिले नाही, त्यांच्या अफेअरची चर्चा सध्या सगळीकडेच होताना दिसते आहे. त्याच पार्श्वभुमीवर आता तेजस्वी प्रकाश वेगळ्याच एका कारणासाठी चर्चेत आहे. तेजस्वी बिग बॉस (Tejasswi Prakash in Big Boss) सहभागी झाल्यापासून प्रसिद्धीच्या झोतात आहे. ती स्वतःच्या हिमतीवर कमी कालावधी इतक्या वर, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. 

तेजस्वी हिचं ती अभिनेत्री आहे जिनं गोव्यात महागडं घर घेतलं असून घराची चावी घेतल्याचा तिचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे. तेजस्वीची ही गुड न्यूज तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा (Karan Kundra Instagram Post) यानं त्याच्या इन्टाग्राम पेजवरून दिली आहे. काल त्यानं हे अपडेट शेअर केलं आहे. या व्हिडीओत तेजस्वी आपल्या नव्या घराची चावी घेताना दिसते आहे ज्यात ती खूपच आनंदी दिसते आहे. (Tejasswi Prakash New Home) 

हा व्हिडीओ शेअर करताना करणनं लिहिलं की, तेजस्वी तुझा फार अभिमान वाटतो, तु अशा सर्व गोष्टींसाठी पात्र आहेस, तुला अशाच चांगल्या चांगल्या गोष्टी मिळत राहो. माझी इच्छा आहे की तु प्रत्येक शहरात घर घ्यावसं’ अशी भावनिक पोस्ट त्यानं लिहिलं आहे. 

यापूर्वी 5 एप्रिल 2022 रोजी तेजस्वीने एक नवीन आलिशान कार खरेदी केली होती. त्यावेळी तिचा प्रियकर करण कुंद्राही तिच्यासोबत होता. कार खरेदी केल्यानंतरही करण असाच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत करण गाडीसमोर नारळ फोडताना दिसत आहे. 

करण आणि तेजस्वीची बिग बॉसमध्ये ओळख झाली तिथूनच त्यांच्या अफेअरची सुरूवात झाली. आता पाहायचंय की करण आणि तेजस्वीही इतर सेलिब्रेटींप्रमाणे लग्नबंधनात अडकणार का? Source link

Leave a Reply