Headlines

Many organizations have congratulated the Shinde-Fadnavis government after demolished illegal-construction-near-afzal-khan-memorial-being-at-pratapgarh-in-satara

[ad_1]

प्रतापगडावर अफजलखान थडग्या भोवतीचे बहुचर्चित अतिक्रमण आज गुरुवारी सकाळपासून शासकीय यंत्रणेने पाडण्याच्या सुरु केलेल्या कारवाईचे विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी स्वागत केले. सातारा जिल्ह्यात हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा- Afzal Khan Grave: साताऱ्यात अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात, प्रतापगडाच्या पायथ्याशी चोख बंदोबस्त

छत्रपती शिवरायांनी अफजलखानाचा वध केल्याच्या दिवशीच अर्थात शिवप्रतापदिनी ही नियोजनबद्ध अतिक्रमण हटाव मोहीम फत्ते होत असल्याने या कारवाईला विशेष महत्व मिळते आहे. शिवप्रतापदिनी स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण हाणून पाडल्याने हा दुग्धशर्करा योग असल्याचे समाधान हिंदुत्ववादी कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. अतिक्रमण हटले तरी ते कसे उभा राहिले? कोणी उभारले? त्याचे समर्थन कोणी केले? या उदात्तीकरणामागील नेमकी शक्ती कोणती? याचा तपास होवून संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशीही मागणी आता होऊ लागली आहे.
भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे म्हणाले, की हिंदवी स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण, बेकायदा बांधकाम हा सारा गंभीर गुन्ह्याचा प्रकार असल्याने त्याचा शोध घेतला जावा. बेकायदेशीरपणे घडलेल्या कृतीबाबत गुन्हे दाखल केले जावेत. पुन्हा अशी दुष्कृत्ये घडू नयेत याची कटाक्षाने खबरदारी घेतली जावी.

हेही वाचा- अफजलखानाचे उद्दात्तीकरण करणाऱ्यांवरही बुलडोजर चालवला पाहिजे, मनसे नेत्याचं खळबळजनक विधान

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, की लोकशाहीत न्यायालयाच्या आदेशाने झालेली कारवाई योग्यच. अतिक्रमण हे चुकीचे असल्याने प्रशासनाने अतिक्रमण झालेलाच भाग पाडला आहे. विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी न्यायालयाच्या आदेशाने झालेल्या कारवाईवर काय म्हणून बोलायचे असा प्रश्न करून यावर बोलणे टाळले.

हेही वाचा- संजय राऊत देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, भाजपा आमदार भातखळकर म्हणाले, “खोके, गद्दार, खंजीर…”

हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष विनायकराव पावसकर म्हणाले, की दीर्घकाळाने का होईना हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्त्यांच्या मागणीला न्याय मिळाल्याचा आनंद आहे. त्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे विशेष अभिनंदन. प्रतापगडावरील हे अतिक्रमण हटावे म्हणून असंख्य कार्यकर्त्यांचे योगदान मोलाचे आहे. या ठिकाणाचे शिवप्रतापभूमी असे नामकरण व्हावे अशी आमची मागणी आहे.

भाजपाचे प्रदेश सचिव विक्रम पावसकर म्हणाले, की स्वराज्याचा शत्रू आणि मंदिरे तोडणाऱ्या अफजलखानाचा कोथळा शिवरायांनी बाहेर काढून शौर्य घडवले होते. मात्र, जेथे हे शौर्य घडले. तेथील अफजलखानाच्या कबरीचे सुरु असलेले उदात्तीकरण तेथील अतिक्रमण तोडल्याने हाणून पाडले गेले आहे. त्यामुळे आज शिवप्रेमींमध्ये आनंदोत्सव आहे. आपण राज्यातील हिंदुत्ववादी सरकारचे मनःपूर्वक आभार मानतो.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *