Headlines

Mangal Vastu Tips : मंगळ मजबूत करण्यासाठी वास्तूमध्ये करा ‘हे’ उपाय, व्यापार आणि करिअरमध्ये मिळेल सफलता

[ad_1]

Vastu Tips for Mangal : आपण राहत असलेली वास्तू आपल्या आयुष्यावर कोणत्या ना कोणत्या पद्धतीने प्रभाव पाडत असते असं जाणकार सांगतात. जर तुमचं घर किंवा ऑफिसची जागा वास्तुशात्रानुसार योग्य नसेल, तर तुम्हाला विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा तुमची प्रगती देखील खुंटते. अशात त्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती खालावत जाते. तुमचे ग्रह आणि वास्तूचं एकमेकांसोबत कनेक्शन असतं असं देखील बोललं जातं. म्हणूनच या बातमीत जाणून घेणार आहोत मंगळ ग्रहाबाबत, ज्याची वास्तूमधील दिशा दक्षिण असते. म्हणजेच, या दिशेवर मंगळ ग्रहाचा सर्वाधिक प्रभाव असतो. चला तर मग जाणून  घेऊया मंगळ ग्रहाला मजबूत करण्याचे काही विशेष उपाय. 

मंगळ अशुभ असल्यास… 

वैदीक ज्योतिषात ( Vaidik Jyotish)  मंगळाला धैर्य, पराक्रम, साहस, शक्ती, क्रोध, उत्तेजना, शत्रू, विवाद आदींचा कारक ग्रह मानलं जातं. अशात तुमचा मंगळ अशुभ ( Ashubh Mangal)  असल्यास या संबंधित त्रासाचा सामना करावा लागू शकतो.  

वास्तुशात्राप्रमाणे ही दिशा पद, प्रतिष्ठा, वडिलांचं सुख आणि जीवनातील स्थिरता प्रदान करणारी मानली जाते. म्हणूनच ही दिशा शुभ असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दिशेत काही दोष असतील तर जीवनात त्रासाचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये प्रचंड राग येणं, भावा भावांमध्ये भांडणं, वैवाहिक जीवनात संकटं, शत्रू सक्रिय होणं, यासारखे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सोबतच रक्तसंबंधित आरोग्याच्या समस्या देखील जाणवू शकतात. म्हणूनच ही दिशा शुभ असणं गरजेचं असतं. 

बेडरूम किंवा स्टोअर रूम

वास्तुशात्रानुसार दक्षिण दिशेला बेडरूम किंवा स्टोअर रूम  (bedroom or store room) असायला हवी. वास्तुशात्रानुसार दक्षिण दिशा ही कायदा, न्याय, खटला, आराम, जीवन आणि मृत्यू यांच्याशी संबंधित आहे. अशाने तुमच्यावर मंगळाचा शुभ ( Good effect of mangal ) प्रभाव पाहायला मिळू शकेल. यामुळे तुमच्या करिअर आणि व्यापारात चांगली सफलताही लाभू शकते.   

असे करा उपाय 

  • मंगळवारी मंगळ ग्रहाच्या बीज मंत्राचा ( Mangal Beej Mantra) जाप करणे 
  • मंगळवारी गूळ आणि भाजलेले चणे माकड किंवा लाल रंगाच्या गायीला खाऊ घाला 
  • मंगळाचा प्रभाव कमी करण्यासाठी मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात बुंदीचा प्रसाद दाखवा 
  • मंगळाचा प्रभाव कमी करण्यासाठी घरात मंगळ ग्रह यंत्राची स्थापना करावी. या यंत्राची स्थापना मंगळवारी सकाळी करावी. सर्वात आधी यावर गंगाजलाचा अभिषेक करून यंत्र शुद्ध करावं आणि त्यानंतर धूप आणि दिवा लावून यंत्र स्थापित करावं 

नोंद : वरील माहिती ही सामान्य ज्ञान आणि गृहीतकांवर आधारीत आहे. दैनंदिन जीवनात याचा वापर करायचा झाल्यास संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *