Mangal Gochar 2022: 27 जूनपासून पुढचे 44 दिवस मंगळ ग्रहाची ‘या’ राशींवर असेल कृपा, जाणून घ्या


Mangal Gochar 2022: 27 जून रोजी मंगळ स्वतःच्या राशीत मेष राशीत प्रवेश करेल. 10 ऑगस्टपर्यंत मंगळ या राशीत राहणार आहे. मंगळ ग्रहाच्या या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर परिणाम दिसून येईल. पण काही राशींना याची शुभ फळं मिळणार आहे.  मेष आणि वृश्चिक राशीचा मंगळ हा ग्रह स्वामी आहे.

या राशींना मिळणार मंगळ संक्रमणाचा लाभ

मेष – या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ ठरणार आहे. या काळात करिअरमध्ये चांगले परिणाम दिसतील. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर या कालावधीत तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल. नोकरदारांसाठीही मंगळाचे संक्रमण लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. त्याचबरोबर लव्ह लाईफमध्येही शुभ संकेत दिसत आहेत.

मिथुन – ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीसाठी देखील हे संक्रमण लाभदायक असणार आहे. नोकरीत लाभ मिळेल. त्याचबरोबर उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा देखील सुधारेल. या काळात पदोन्नतीची दाट शक्यता आहे.

सिंह – या काळात व्यक्तीला नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता दिसत आहे. गुंतवणुकीसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे. उत्पन्न वाढू शकते. एक नव्हे तर अनेक ठिकाणांहून पैसा वाढेल. आरोग्य चांगले राहील आणि समाजातील प्रतिमाही चांगली राहील.

तूळ – भागीदारीत काम करत असाल तर चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. पगारदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. पाहिले तर हा काळ करिअरसाठी चांगला आहे. पण तूळ राशीच्या लोकांना प्रेमप्रकरणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)Source link

Leave a Reply