मलायकासोबतच्या नात्याबाबत अर्जुनच्या घरी कळताच काय होतं त्यांचं Reaction?


मुंबई : बॉलिवूडमध्ये जेव्हा अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या नात्याची जाहीर चर्चा होऊ लागली, तेव्हा चाहत्यांना धक्काच बसला. मलायकाचा घटस्फोट, त्यानंतर तिची आणि अर्जुनची वाढणारी जवळीक सर्वजण पाहत होते. हे नातं नेमकं कोणत्या वळणावर चाललं आहे, हे सर्वांनीच पाहिलं. मुख्य मुद्दा असा, की ज्यावेळी अर्जुनच्या कुटुंबीयांपर्यंत ही बाब पोहोचली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया त्याच्यासाठीही अनपेक्षित होती. 

Koffee with Karan 7 या टॉक शोमध्ये अर्जुननं नुकतीच हजेरी लावली होती, जिथं त्यानं मलायकासोबतच्या नात्यावर वक्तव्य केलं. तिच्यासोबतचं नातं जगापुढे आणताना इतकी लहान पावलं का उचलली गेली, असा प्रश्न निर्माता- दिग्दर्शक करण जोहर यानं अर्जुनला केला. (Bollywood Actor Arjun kapoor on accepting relationship with girlfriend malaika arora) 

(Arjun kapoor) अर्जुननं या प्रश्नाचं उत्तर देत वस्तुस्थिती सर्वांपुढे ठेवली. आपण एका विभक्त कुटुंबात लहानाचे मोठे झालो. जिथे, गोष्टी बिनसलेल्या असतानाही त्यांचा स्वीकार केला जाणं अपेक्षित होतं. अशा वेळी माझं मलायकावर नात्यासंदर्भात दबाव टाकणं योग्य नव्हतं असं तो म्हणाला. 

मलायकाशी आपण याविषयी बोललो नाही, असं नाही.. पण या बाबतीत धीम्या गतीनंच पुढे जावं लागलं असं सांगत त्यानं तिच्या पूर्वायुष्यावरही कटाक्ष टाकला. परिस्थिती स्वीकार करतच आपण या नात्यात पुढे आल्याचं त्यानं या मुलाखतीत स्पष्ट केलं. 

अर्जुनच्या कुटुंबापर्यंत ज्यावेळी हे नातं पोहोचलं तेव्हा कोणीच नकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या आधारामुळं त्याला या नात्याबाबत फार विचार करावा लागला नाही. परिणामी गोष्टी अधिक सुकर झाल्या. 

लग्नाचा विचार करतोय अर्जुन? 
सध्या तरी आपण लग्नाच्या विचारात नसल्याचं सांगत त्यानं सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. या घडीला तो करिअरवरट लक्ष केंद्रीत करत असून, आयुष्याची घडी व्यवस्थित बसवण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. जेव्हा मी आनंदात असेन, तेव्हाच मी जोडीदारालाही आनंदात ठेवू शकेन इतक्या सुंदर शब्दांत त्यानं मलायकासोबतचं नातं सर्वांपुढे आणलं. Source link

Leave a Reply