मलायकासोबत नातं काय? अर्जून कपूरने पहिल्यांदाच केला ‘हा’ खुलासा


Arjun Kapoor on Malaika Arora: सध्या बॉलीवूडमध्ये सर्वात हॉट कपल कोण असेल तर ते म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. आपल्या नात्याविषयी ते दोघं फारसे बोलताना दिसत नाहीत पण त्यांच्या कृतीतून मात्र त्याच्या नात्याबद्दल अनेकदा खुलासा करत असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ टाकण्यापासून ते कुठल्याही पार्टीला, डिनरला एकत्र जाण्यापर्यंत सगळ्याच ठिकाणी ते अनेकदा स्पॉट होत असतात. 

करण जोहरच्या कॉफी विथ करन या कार्यक्रमात नुकतीच अर्जुन कपूरने हजेरी लावली होती. यावेळी करण जोहरच्या प्रश्नांना उत्तरं देताना अर्जुन कपूरने मलायका आणि त्याच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. करण जोहर कॉफी विथ करण या कार्यक्रमातून सेलिब्रेटींच्या लव्ह लाईफविषयी अनेक प्रश्न हे विचारत असतो. त्यापैंकीच एक प्रश्न त्याने अर्जुन कपूरला केला. त्यावर उत्तर देताना अर्जुन कपूर म्हणाला की आमच्या अफेअरबद्दल सगळीकडेच बरीच चर्चा सुरू होती. पण आम्हा दोघांनाही आमचे नाते अधिक सार्वजनिक करायचे नव्हते कारण चाहत्यांमध्ये आमच्या नात्याबद्दल जास्त जाहीर काहीच करायचं नव्हतं. 

मलायकाबद्दल बोलताना अर्जून कपूर म्हणाला की, आपल्यासोबत एक असा व्यक्ती पाहिजे जो नेहमीच तुम्हाला आनंद देईल. मलायका ही ती व्यक्ती आहे. माझ्यासाठी तिच्यासोबत असलेले नाते हे असेच आहे. जेव्हा एका रिलेशनशिपमध्ये तुम्ही आपल्या पार्टनरसोबत आनंदी असता तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसोबत अशा बऱ्याच गोष्टी शेअर करू शकता. 

अर्जुनने मलायकाच्या फिटनेसबद्दलही बोलताना तिची प्रशंसा केली आहे. तो म्हणाला, मलायका ही अशी एक व्यक्ती आहे जी माझ्यावर नेहमीच प्रभाव पाडते. तिचा फिटनेस पाहून मीही तिच्याकडून बरंच काही शिकतो. अनेकांसाठी ती प्रेरणा आहे आणि तिच्या अनेक गोष्टी या मला प्रेरित करत असतात. 

“ती नेहमीच मला सहकार्य करते. माझ्यातील उणिवांची तिला व्यवस्थित जाण आहे तसेच माझ्या भावनांनाही ती नेहमी समजून घेते. मी कोणत्याही नकारात्मक परिस्थितीतून असेल तर ते ती लगेगच ओळखते. तिला माझी पुर्ण जाण आहे. तिचं व्यक्तिमत्त्व हे खूप शांत असं आहे त्यामुळे मीही कुठल्या तणावपुर्ण परिस्थिती असेन तर ती नेहमीच मला त्यातून बाहेर काढते. 

“मलायका सोबत राहणे ही माझी निवड आहे. पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं हे प्रत्येक जण समजून घेतीलच अशातला भाग नाही. सगळ्यांना कधीतरी ते समजेलच अशी मी अपेक्षा करतो. मला तिच्या भुतकाळाची पुर्णपणे जाणीव आहे.”, अशी भावना अर्जुनने मांडली. 

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत आणि त्यांनी 2019 मध्ये इन्स्टावरून याची जाहीर घोषणाही केली होती.Source link

Leave a Reply