मलायकाआधी ‘या’ अभिनेत्रींचा अपघात… एका चिमुकलीचा मृत्यू, तर कोणी कोमात


मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला असून तिची प्रकृती आता स्थिर आहे. पण मलायकाच्या आधी अभिनेत्रीचा अपघात झाला. अपघातामुळे काही अभिनेत्रींट्या चेहऱ्यावर  जखमा झाल्या, तर काही अभिनेत्री कोमामध्ये गेल्या.. अशा अभिनेत्रींबद्दल आज जाणून घेवू…

अभिनेत्री मलायका अरोरा

मलायकाच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि त्याची कार इतर तीन कारला धडकली. मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं अपघातानंतर लगेचच तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

अभिनेत्री शबाना आजमी

शबाना आजमी एक्सीडेंट
जानेवारी 2020 मध्ये मुंबई-पुणे महामार्गावर शबाना आझमी यांचाभीषण अपघात झाला होता. खालापूरजवळ त्यांची कार ट्रकला धडकली. त्यांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. 

अभिनेत्री हेमा मालिनी

हेमा मालिनी कार एक्सीडेंट

जुलै 2015 मध्ये राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात हेमा मालिनी यांच्या कारला इतका भीषण अपघात झाला होता. हा अपघात इतका भयानक होता की, हेमा यांची कार ज्या कारला धडकली, त्या कारमधील एका मुलीचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले.  

अभिनेत्री अनु अग्रवाल

अनु अग्रवाल का एक्सीडेंट
अनु अग्रवाल 1999 मध्ये एका अपघाताची शिकार झाली होती. हा अपघात इतका गंभीर होता की अनु अग्रवाल कोमात गेल्या होत्या.Source link

Leave a Reply