malaika मुळे चाहते पुन्हा हैराण!!! आता चक्क कॅमेऱ्यासमोरच बदलले कपडे?


Malaika Arora Transition Video: मलायका अरोरा आपल्या ड्रेसिंग सेन्समुळे सर्वाधिक चर्चेत असते. सध्या मलायकाची चर्चा तिच्या फॅशनवरून अधिक न होता तिच्या आणि अर्जूनच्या अफेअरवरूनच होत आहे त्यातून आपल्या जिम लुकमुळेही मलायका अरोरा ही कायम चर्चेत असते.

आपल्या आऊटफिट्सला घेऊनही ती सतत काही ना काही प्रयोग करत असते. आपल्या वेगवेगळ्या स्टाईलिश लुकमुळे मलायकावर तिचे चाहते मनापासून प्रेमाचा वर्षाव करतात तर अनेकदा तिला ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. ट्रोलिंग होत असूनही मलायका मात्र आत्मविश्वासाने कुठलेही कपडे आनंदाने परिधान करते. 

इंडस्ट्रीतल्या स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री मलायका अरोरा ही सोशल मीडियावरसुद्धा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. रोज नवनवे फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करत ती आपल्या चाहत्यांनाही खूश करत असते. मलायकाने नुकताच असाच एक आपला व्हिडिओ इन्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा मलायकाचा नवा रिल पाहून मलायकाचे चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. 

यात व्हिडिओतही मलायका पुन्हा एकदा आपल्या स्टाईलिश लुकसह चाहत्यांसमोर आली आहे. या व्हिडिओत तर तिने चक्क कॅमेऱ्यासमोरच कपडे बदलले आणि आपला गेटअप चेन्ज केला. तिचा हा transition video सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. 

शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका सुरुवातीला मेकअपशिवाय साध्या कपड्यांमध्ये दिसली. त्यानंतर तीन, दोन आणि एक असं काऊंटडाऊन होताच ती क्षणार्धात शॉर्ट ड्रेस आणि जॅकेट लूकमध्ये सर्वांसमोर आली. तेव्हा हा व्हिडीओ पाहताना चक्क असे वाटून आले की तिने कॅमेऱ्यासमोरच कपडे चेन्ज केलेत की काय?

आपला हा व्हिडिओ शेअर करत मलायकाने लिहिले आहे की, ”It is a Sunday. It’s time for some transitions. 3,2,1 & ? Dressed in @kunalrawaldstress..”. मलायकाने फॅशन डिझायनर कुणाल रावलचा ड्रेस परिधान केला आहे. सोनेरी रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि वरून जॅकेट असा तिचा हा लुक आहे. 

या व्हिडिओवर कमेंट करताना चाहते तिच्या ड्रेसचे आणि तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसले.   Source link

Leave a Reply