Headlines

वापरात नसलेल्या जुन्या फोनलाच बनवा CCTV कॅमेरा, फॉलो करा या टिप्स

[ad_1]

वी दिल्ली: Phone As CCTV: तुम्ही जर नुकताच नवीन फोन खरेदी केला असेल आणि घरी असलेला जुना स्मार्टफोन वापरात नसेल तर, त्या फोनचा उपयोग तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून करू शकता. सहसा ही यंत्रणा बसवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात, हे करायचे नसल्यास तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन सुरक्षा कॅमेरा म्हणून वापरू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अटॅचमेंट वेगळे खरेदी करण्याची गरज नाही. हे करण्यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

वाचा: Jio च्या स्वस्तात मस्त प्लानमध्ये Free मिळणार Netflix, Amazon Prime ची मजा

फोनमध्ये Security Camera App इन्स्टॉल करा:

तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जुन्या फोनवर सिक्युरिटी कॅमेरा अॅप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. असे अनेक अॅप्स Google प्ले स्टोअर आणि ऍपल अॅप स्टोअरवर लिस्ट आहेत. तुम्ही क्रॉस-प्लॅटफॉर्म फंक्शनलिटीसह लोकल आणि क्लाउड स्ट्रीमिंग आणि क्लाउड फुटेज स्टोर किंवा मोशन डिटेक्ट अलर्ट पाठवणे यासारखी वैशिष्ट्ये ऑफर करणारे अॅप निवडले पाहिजे. अल्फ्रेड DIY सीसीटीव्ही होम कॅमेरा असे एक अॅप आहे आणि ते सेटअप करणे सोपे आहे.

वाचा: VI युजर्सची मजा, या प्लानमध्ये रोज 4GB हाय स्पीड डेटासह अनेक फायदे, किंमत नाही जास्त

तुमच्या जुन्या आणि नवीन दोन्ही फोनवर अल्फ्रेड DIY CCTV होम कॅमेरा अॅप डाउनलोड करा, ज्या फोनवरून तुम्हाला सुरक्षा फुटेज पहायचे आहे.
तुमच्या नवीन किंवा प्रायमरी फोनवर अॅप उघडल्यानंतर, ‘स्टार्ट’ वर टॅप करा आणि ऑन-स्क्रीन सूचना फॉलो करा. आता ‘व्यूअर’ निवडल्यानंतर ‘पुढील’ वर टॅप करा. यानंतर तुम्हाला तुमच्या Google खात्याच्या मदतीने साइन इन करावे लागेल. जुन्या फोनवर तीच प्रक्रिया करत असताना, तुम्हाला ‘व्ह्यूअर’ ऐवजी ‘कॅमेरा’ निवडावा लागेल आणि त्याच Google खात्याने लॉग इन करावे लागेल.

सेटिंग्जमध्ये जाऊन, तुम्ही इतर आवश्यक बदल करू शकाल आणि जुन्या फोनच्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड केलेले फीड प्राथमिक फोनमध्ये दिसू लागेल. तुम्ही तुमचा जुना फोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याप्रमाणे कुठेही सेटअप करू शकता आणि त्याचे फुटेज प्राथमिक फोनमध्ये पाहता येईल. महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही स्मार्टफोन वायफाय किंवा इंटरनेटशी कनेक्ट केलेले असावेत. यासोबतच तुम्हाला जुन्या फोनला पॉवर केबलच्या मदतीने पॉवर द्यावा लागेल, जेणेकरून त्याची बॅटरी संपणार नाही. तुम्ही पॉवर बँक किंवा डायरेक्ट चार्जरच्या मदतीने हे करू शकता.

वाचा: तुमच्या Aadhaar Card चा कधीच गैरवापर होणार नाही, फॉलो करा सोपी टिप्स, राहा सेफ

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *