Headlines

Makar Sankranti 2023 : मकर संक्रांतीबाबत संभ्रम आहे? 14 की 15 जानेवारी, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी

[ad_1]

Makar Sankranti Shubh Muhurat 2023 : हे वर्ष सरायला आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी फक्त एक महिना राहिला आहे. नवं वर्ष म्हणजे नवं चैतन्य…जानेवारी महिना सुरु झाला की पहिला सण असतो तो मकर संक्रांतीचा…महिलांपासून अनेक जणांना मकर संक्रांत  (When is Makar Sankranti 2023) ही 14 जानेवारी की 15 जानेवारी नेमका कधी साजरा करायचा याबद्दल संभ्रम  असतो. धार्मिक मान्यतांनुसार सूर्याच्या राशी बदलाच्या दिवशी मकर संक्रांती हा सण (Makar Sankranti 2023 Shubh Muhurta) साजरा केला जातो. 

‘या’ दिवशी साजरी करा मकरसंक्रात (Makar Sankranti 2023 Date)

संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे त्याला मकर संक्रांती म्हटलं जातं. दरवर्षी मकर संक्रांतीला सूर्य धनू राशीतून मकर राशीत जातो. या दिवसापासून सर्व प्रकारची शुभ कार्ये सुरू होतात. दरवर्षी मकर संक्राती हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. पण 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी होणार आहे. जाणून घेऊया मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्त.

मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त (Makar Sankranti 2023 Shubh Muhurat )

नवीन वर्षात म्हणजे 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी रोजी म्हणजे रविवारी साजरी केली जाईल. 14 जानेवारी रोजी रात्री 8.21 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि 15 जानेवारी 2023 रोजी उदय तिथीनुसार मकर संक्रांती साजरी केली जाईल.यावेळी मकर संक्रांती पुण्यकाळ मुहूर्त सकाळी 07.15 ते दुपारी 12.30 पर्यंत असेल. एकूण कालावधी 05 तास 14 मिनिटे आहे, तर महापुण्य काल मुहूर्त 07:15 ते 9:15 पर्यंत असेल. याला एकूण कालावधी 2 तासांचा असणार आहे.

मकर संक्रांतीला नक्की करा हे काम  (Makar Sankranti 2023 Upay)

तिळाच्या पाण्यान आंघोळ करा 

 मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करताना पाण्यात काळे तिळ आणि गंगाजल आवश्य मिसळा. असं केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. तसंच कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. सूर्य आणि शनि या दोन्ही ग्रहांची कृपा प्राप्त होते.

सूर्यदेवाला अर्घ्य द्या 

 मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे तीळ, गूळ, लाल फुले, अक्षता इत्यादी टाकून ओम सूर्याय नमः मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.

गरिबांना दान करा

मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी गरिबांना दान करा. या दिवशी दान केल्याने शुभ फळ प्राप्त होते. या दिवशी खिचडी खाण्याचीही परंपरा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी या सणाला खिचडीचे पर्व म्हणूनही ओळखले जाते. तर महाराष्ट्रात तिळाची गोड पोळी केली जाते. तिळ घालून भाकरीही अनेक भागात खाल्ली जाते. 

मकर संक्रांतीची पौराणिक कथा

असं म्हटलं जातं की, मकर संक्रांत हा पिता-पुत्राच्या अनोख्या मिलनाचा सण मानला जातो. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जातात. मकर संक्रांतबद्दल अजून एक पौराणिक कथा आहे. मकर संक्रांत भगवान विष्णूचा असुरांवर विजय म्हणून देखील साजरी केली जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील राक्षसांचा वध करून त्यांचे मुंडके कापून मंदरा पर्वतावर पुरले, असं सांगितलं जातं. 

तीळ आणि गूळ यांचं महत्व?

मकर संक्रांतीला तीळ आणि गूळला महत्त्व आहे. यादिवशी लाडू किंवा वड्या करण्याची प्रथा आहे. असं म्हटलं जातं की जुन्या आठवणी विसरून तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा. म्हणून म्हटलं जातं की, तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला. पण यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. जानेवारी महिना म्हणजे थंडीचा कडाका..मग अशात शरीराला उष्णता मिळावी म्हणून तीळ आणि गूळ खाल्ला जातो.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *