माझी सर्वात मोठी चूक…. स्वत:च्या मुलीबद्दल आमिर असं काही बोलेल याची अपेक्षाच कोणी केली नव्हती


मुंबई : अभिनेता आमिर खान यानं काही महिन्यांपूर्वी पत्नी किरण राव हिच्यासोबतच्या वैवाहिक नात्यातून दुरावा पत्करला. पाहता पाहता आमिर आणि किरण अगदी सहजपणे या नात्यातून सावरले. म्हटल्याप्रमाणे ते आपल्या या नात्यात मैत्रीला प्राधान्य देताना दिसले. (aamir khan)

पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीशी असणारं आमिरचं नातं फार काळ चिकलं नाही. पण, मुलांशी मात्र तो कायमच एका सुरेख नात्याला कुरवाळताना दिसला. 

किमान माध्यमांसमोर आला तेव्हा तरी आमिर आणि त्याच्या मुलांचं नातं हेवा वाटण्याजोगं होतं. पण, आमिरला मात्र यातही पश्चादापाची झळ लागत होती. 

हा पश्चाताप, ही खं त्याच्या मनात सल करुन होती. नुकतंय एका मुलाखतीदरम्यान त्यानं ही खंत बोलूनही दाखवली. 

‘ही माझी सर्वात मोठी चूक आहे’, असं म्हणत आपण मुलांसमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करु शकलो नाही, याची खंत त्यानं बोलून दाखवली. 

मी यासाठी माझ्या कामाला दोष देणार नाही. आज आयरा 23 वर्षांची आहे. जेव्हा ती 4-5 वर्षांतची होती तेव्हा तिच्यासाठी मी तिथे नव्हतो. मी चित्रपटांमध्येच गुंतलो होतो, असं आमिर म्हणाला. 

बालवयाचत प्रत्येक मुलाला पालकांची गरज असते. कारण, त्या वयात तुमच्या मनात भीती आणि आशाही दडलेली असते, असं म्हणत आयराला जेव्हा माझील गरज होती तेव्हाच नेमका मी तिच्यासोबत नव्हती… असं म्हणत गेलेला तो क्षण परत येणार नाही अशी खंत व्यक्त केली. 

आमिरकडे त्याच्या मुलांनी कधी ही खंत व्यक्त केली नाही, पण तरीही शेवटी बापाचं काळीज ते… मनाला सलणारी ही गोष्ट कित्येक वर्षांनी समोर आलीच…. Source link

Leave a Reply