‘माझी गर्लफ्रेण्ड हो आणि मी तुला…’, Nora Fatehi ला सुकेश चंद्रशेखरने दिलेली खास ‘ऑफर’


Money Laundering Case : 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) सध्या दिल्लीच्या (Dehli) मंडोली तुरुंगात बंद आहे. सुकेशसोबतच बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत (Jacqueline Fernandez) अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) देखील मनी लाँड्रिंग प्रकरणात (money laundering) चौकशीच्या फेऱ्यात आहे. या दोघींच्या अडचणी कमी होण्या ऐवजी वाढत आहेत. यावेळी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टमध्ये सुनावणी सुरु असताना या दोघींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यावेळी नोरा आणि जॅकलिननं दिलेल्या वक्तव्यात मोठा खुलासा केला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नोराने तिचा जबाब नोंदवत सांगितले की, सुकेश त्याची पार्टनर पिंकीच्या मदतीनं अशी फसवणूक करत होता. नोराच्या म्हणण्यानुसार, ‘सुकेशनं तिला त्याची गर्ल फ्रेंन्ड होण्यास सांगितले होते. त्या बदल्यात त्यानं तिला आलिशान घर आणि लक्झरी लाइफस्टाइलचे आमिश दाखवले होते. सुकेशला काही मेसेज द्यायचा असेल तर तो पिंकी इराणीच्या माध्यमातून द्यायचा.’ सुकेशला ती कधी भेटली नाही. इतकंच काय तर त्याच्या फसवणुकीची कल्पनाही तिला नव्हती, असे नोरानं सांगितले. याशिवाय नोरानं दावा केला होता की तिनं सुकेशला पहिल्यांदा ईडी ऑफिसमध्येच पाहिले होते. (Nora Fatehi’s Statement On sukesh chandrasekhar Money Laundering) 

दरम्यान, जॅकलिननं दिलेल्या माहितीनुसार, सुकेशनं तो सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगत ओळख करून दिली होती. इतकंच काय तर त्यानं असा दावा केला की तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता त्याची मावशी होती. याविषयी सांगत जॅकलीन म्हणाली, ‘सुकेश म्हणाला की तो माझा खूप मोठा चाहता आहे आणि मी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करायला हवे. तो सन टीव्हीचा मालक असून तो मला अनेक प्रोजेक्ट्स देईल असे त्यानं सांगितले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपण एकत्र काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.’

हेही वाचा : ‘सुकेश चंद्रशेखर म्हणाला होता, CM जयललिता…’, Jacqueline Fernandez चा मोठा खुलासा

जॅकलिन म्हणाली, ‘सुकेशने माझी फसवणूक केली, ‘माझे करिअर उद्ध्वस्त केले. मला खूप उशिरा याची माहिती मिळाली की त्याला गृह आणि कायदा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अटक केले. त्यानंतर मला त्याचं खरं नाव कळलं. तर पिंकी इराणीनं याविषयी कधीही कोणता खुलासा केला नाही तिनं देखील माझा विश्वासघात केला.Source link

Leave a Reply