“माझी अक्कल काढली तर…” ; किशोरी पेडणेकरांच्या ‘त्या’ टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंच प्रत्युत्तर“आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही नेता नसेल. पक्षातील सगळे नेते शिंदे गटात येतील”, असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वक्तव्यानंतर शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकरांनी बावनकुळेंवर जोरदार टीका केली. “नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं. असा खोचक टोला पेडणेकरांनी लगावला होता”. या टोल्याला आता बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

किशोरी पेडणरांची बानवकुळेंवर टीका

“आगामी निवडणुकीत शिवसेनेचा एकही नेता नसेल. पक्षातील सगळे नेते शिंदे गटात येतील”, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केलं होतं. त्यांना उत्तर देताना किशोरी पेडणेकरांनी जोरदार टीका केली. “नुसतं बावनकुळे आडनाव असून चालत नाही, तर डोक्यात पण काहीतरी असावं लागतं”. असा खोचक टोला पेडणेकरांनी लगावला होता. “गेल्या काही दिवसांपासून शिंदेगटातील नेत्यांकडून हिंसक वक्तव्य करण्यात येत आहेत. कुणी तंगडं तोडेल, कुणी हात-पाय तोडेल अशा धमक्या देत आहेत, त्यामुळे या सर्वांची तक्रार पोलिसांकडे करणार” असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. शिवसेनेचं शिष्टमंडळ घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाणार असल्याचंही त्या म्हणाल्या होत्या.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

किशोरी पेडणेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “जेव्हा जनाधार कमी होतो. माणसं तुटत जातात. संघटन कमी होतं. तेव्हा असे वक्तव्य येतात. माझी अक्कल काढणे, माझी बुद्धी काढतील. पण मला काही वाईट वाटत नाही. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. येत्या काही दिवसात एक वेळ अशी येईल, त्यांना त्यांची वक्तव्य बंद करावी लागतील”, असेही बावनकुळे म्हणाले होते.

Source link

Leave a Reply