Headlines

‘माझा देश महान असेल पण..’ या Irfan Pathan च्या अपूर्ण ट्वीटवर शाब्दिक चकमक

[ad_1]

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) माजी ऑलराउंडर इरफान पठाणने (Irfan Pathan) एक ट्विट केलंय. या ट्विटमुळे इरफान पुन्हा एकदा चर्चेत आलाय. इरफानने भारताबाबत एक ट्विट केलंय. या ट्विटवरुन फिरकीपटू अमित मिश्रा (Amit Mishra) आणि इरफानमध्ये ट्विटर वॉर रंगलंय. मिश्राने इरफानवर टीका केलीय. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.

इरफान पठाणने ट्विटमध्ये काय म्हटलंय?

“माझा देश, माझा सुंदर देश, पृथ्वीवरील सर्वात महान देश बनण्याची क्षमता आहे. पण….”, अशा आशयाचं अर्धवट ट्विट इरफानने केलं. अमित मिश्राने या अर्धवट ट्विटला नाव न घेता इरफानला ट्विटद्वारेच उत्तर दिलं. इरफान सध्या आयपीएलच्या 15 व्या मोसमात कॉमेंट्री करतोय.

अमित मिश्राचं प्रत्त्युतर

“माझा देश, माझा सुंदर देश, या देशात धरतीवरील सर्वात चांगला देश बनण्याची क्षमता आहे. पण फक्त तेव्हाच जेव्हा काही लोकांना हे जाणवेल की संविधान हे पहिलं पुस्तक आहे, ज्याचं अनुसरण करायला हवा”, असं ट्विट मिश्राने केलं. 

या ट्विटद्वारे मिश्राने इरफानचं कुठेच नाव घेतलं नाही. मात्र अमितच्या या ट्विटचा रोख हा इरफानकडेच असल्याचं म्हटलं जात आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *