मैदानात फ्लॉप पण CSK हॉटेलमध्ये हिट! चेन्नईचा हॉटेलमध्ये धमाका


मुंबई : आयपीएलचे सामने चुरशी होत आहे. यामध्ये चेन्नई मात्र यावेळी मागे पडली आहे. गतविजेत्या चेन्नईला केवळ एक सामना यंदाच्या आयपीएलमध्ये जिंकता आला. मैदानात एक सामना खेळून फ्लॉप ठरलेल्या खेळाडूची प्री वेडिंग पार्टी करण्यात आली. या पार्टीमध्ये CSK च्या खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला.

CSK टीमच्या हॉटेलमध्येच या पार्टीचं आयोजन करण्यात आलं. या पार्टीमध्ये टीममधील खेळाडू दाक्षिणात्य पारंपरिक कपड्यांमध्ये पाहायला मिळाले. चेन्नईनं त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

परदेशी खेळाडू डेवोन कॉनवेच्या प्री वेडिंग लग्नाची पार्टी मुंबईत हॉटेलवर आयोजित करण्यात आली होती. या पार्टीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीत खेळाडूंनी दाक्षिणात्य पेहराव केला होता. त्यांनी डान्स केला खूप धमाल केली आणि डेवॉनला गिफ्टही दिलं. 

डेवॉन पहिल्यांदाच चेन्नई टीममधून खेळत आहे. त्याला आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यांपैकी एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्येही तो फेल गेला. डेवॉन 3 धावा करून तंबुत परतला. 

डेवॉनने आपल्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा केला होता. आता तो लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. डेवॉनसाठी खास चेन्नईनं प्री वेडिंग पार्टीचं आयोजन केलं होतं. सध्या या फोटोंची खूप चर्चा आहे.Source link

Leave a Reply