Headlines

“…म्हणून मैदानही तेच राहणार” दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवेंचा शिंदे गटाला खोचक टोला! | Shivsena Leader ambadas danve on eknath shinde group and dasara melava rmm 97

[ad_1]

दरवर्षी शिवसेना पक्षाकडून शिवतीर्थावर दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येत. गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला यादिवशी संबोधित करत होते. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना पक्षाची परंपरा अशीच सुरू ठेवली. पण अलीकडेच शिवसेना पक्षात पडलेल्या फुटीमुळे यावर्षी शिवतीर्थावर कोण दसरा मेळावा घेणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

आम्हीच खरी शिवसेना असून शिवतीर्थावर आम्हीच दसरा मेळावा घेणार, असा दावा ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून केला जात आहे. हा वाद सुरू असताना शिवसेना पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटातील नेत्यांना खोचक टोला लगावला आहे. शिवसेना पक्षानं कधीही झेंडा बदलला नाही, कधीही नेता बदलला नाही. ‘एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान’ हे नेहमीच शिवसेनेचं घोषवाक्य राहिलं आहे, त्यामुळे यावर्षीही शिवतीर्थावर आम्हीच दसरा मेळावा घेणार, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे. ते ‘टीव्ही९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

हेही वाचा- एकनाथ खडसेंचा निर्णय चुकला? राष्ट्रवादीत प्रवेश करण्यावरून पंकजा मुंडेंचं मोठं विधान!

दसऱ्या मेळाव्यावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे म्हणाले की, “शिवसेनेनं कधीही झेंडा किंवा नेता बदलला नाही. शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्याचं हे ५६ वे वर्ष असेल. शिवसेना पक्षाची जेव्हा स्थापना झाली, तेव्हापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित केला जात आहे. ‘एक झेंडा, एक नेता आणि एक मैदान’ हे शिवसेनेचं नेहमीच एक वाक्य राहिलं आहे.

हेही वाचा- “रस्त्यावरील शेंबडं पोरगंही…” शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल!

“कित्येक लोकांनी झेंडे बदलले, कित्येक लोकांनी नेते बदलले. पण १९६७ पासून शिवसेनेचा तोच ध्वज कायम आहे. नेतेही तेच आहेत… त्यामुळे मैदानही तेच राहणार आहे. म्हणून शिवसैनिकांच्या किंवा महाराष्ट्राच्या मनात शंका येण्याचं काहीही कारण नाही. शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा काही एका राजकीय पक्षाचा मेळावा नाही, तो महाराष्ट्राच्या विचाराचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मेळावा आहे. यादिवशी विचारांचं सोनं लुटलं जातं, त्यामुळे याबाबत संभ्रम आणि संशय असण्याचं काहीही कारण नाही” असं स्पष्ट विधान अंबादास दानवे यांनी केलं आहे.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *