Headlines

…म्हणून एकनाथ शिंदेंनी राजकारण सोडण्यासंदर्भातील ‘ते’ वक्तव्य केलं असावं; रोहित पवारांनी सांगितलं संभाव्य कारण | Rohit Pawar on why cm eknath shinde must have comment about quitting politics scsg 91

[ad_1]

राज्यामध्ये सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षासंदर्भात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी आपली मतं व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘मोठे नेते’ असा केला आहे. राज्यामध्ये २१ जूनपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये आपली भूमिका मांडताना या राजकीय घडामोडींबद्दलची आपली मतं व्यक्त केली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोर आमदारांपैकी एकही आमदार पडणार नाही, पराभूत झाला तर मी राजकारण सोडून देईन या विधानासंदर्भातही भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> शिंदे गटाकडून शरद पवार, अजित पवारांवर का टीका केली जातेय?; रोहित पवार उत्तर देताना म्हणाले, “त्यांच्यावर खापर फोडलं तर…”

महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना २९ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला. या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या समर्थनाच्या आधारे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा उद्धव ठाकरेंचं समर्थन करणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय. शिवसेनेच्या याच दाव्यावर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले होतो. एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून देईन, असे मी याआधीच सांगितले आहे; असे शिंदे नुकतेच एका जाहीर सभेत बोलले.

नक्की वाचा >> “आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल”

“बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असे म्हटले जात आहे. पण मी म्हणतो एकही आमदार पडणार नाही. याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला, तर मी राजकारण सोडून निघून जाईल,” असे भाष्य एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच पुढे बोलताना कोण जिंकणार कोण पराभूत होणार हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? हे सगळं जनता ठरवत असते. मतदार ठरवत असतात,” अशी खोचक टीकादेखील यावेळी शिंदे यांनी केली.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

रोहित पवार काय म्हणातात?
शिंदे यांच्या याच राजकारण सोडण्याच्या वक्तव्यासंदर्भात रोहित पवार यांनी ‘आयबीएन लोकम’त या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. “समर्थक आमदार पडले तर राजकारण सोडेन असं एकनाथ शिंदे सांगत आहेत,” असा उल्लेख करत रोहित यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना रोहित यांनी, “एकनाथ शिंदे मोठे नेते आहेत. एखाद्या नेत्याला आपल्या लोकांना आत्मविश्वास द्यावाच लागतो,” असं म्हटलं. बंडखोर नेत्यांना विश्वास देण्याच्या हेतूने एकनाथ शिंदे यांनी एक जरी आमदार पडला तर राजकारण सोडेन असं म्हटल्यासारखं वाटतंय असं सूचित केलं.

नक्की वाचा >> “शिंदे-भाजपा सरकार म्हणू नका…”, ‘त्या’ प्रश्नावर चिडले मुनगंटीवार; घराणेशाहीवरुन टीका करत म्हणाले, “पक्ष कार्यकर्त्यांचा की…”

पुढे बोलताना, “खालच्या स्तराला (कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवर) समीकरणं कसं आहे हे निवडणुका जवळ आल्यानंतर कळतं,” असंही त्यांनी म्हटलं.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *