Headlines

“…म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका”, मंत्री दीपक केसरकरांचं वक्तव्य | Deepak Kesarkar comment on reason behind threat to Eknath Shinde



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पोलिसांनी शिंदेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका असल्याचं कारण सांगितलं. ते रविवारी (२ ऑक्टोबर) सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत. गडचिरोलीचे पालकमंत्री असताना त्यांनी नक्षलवाद्यांविरोधात कारवाई केली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या जीविताला धोका आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सुरक्षा सोडून गर्दीत जाऊ नका असं नेहमी सांगतो. कारण असं ज्या ज्या लोकांनी केलं आहे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या कारणामुळे आपण दोन पंतप्रधानांना गमावले आहे.”

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लोकप्रिय आहेत. मात्र, त्यांना सुरक्षेबाबतही खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यांनी सुरक्षेबाबत खबरदारी घेतली नाही, तर त्यांचे महाराष्ट्र सुखी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. हे मी गृहखात्याचा माजी गृहराज्यमंत्री म्हणून सांगु शकतो.

सांगलीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर संतापले

सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गोंधळ करणाऱ्या शिक्षण संस्था चालकांना झापल्याची घटना घडली. खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर दीपक केसरकरांनी संस्था चालकांना खडेबोल सुनावले. पवित्र पोर्टल भरतीवरून शिक्षण संस्था चालकांनी, शिक्षणमंत्र्यांचे भाषण सुरू असताना पवित्र पोर्टल रद्द करा, अशा घोषणा दिल्या.

यानंतर संतप्त दीपक केसरकरांनी संस्थाचालकांची भाषणामध्येच खरडपट्टी केली.केसरकर यांनी सुप्रिया सुळे यांनी विषय मांडला म्हणून मी बोलतोय, असं सांगितलं. तसेच पवित्र पोर्टल रद्द करायला मी येथे आलो नाही, असं नमूद केलं. “

हेही वाचा : मुस्लीम सर्वेक्षणाच्या जीआरनंतर अफवांचं पेव, शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “काही आक्षेपार्ह…”

तुम्ही पाहुणा म्हणून बोलावले आणि मी पाहूणा म्हणून आलो आहे. त्यामुळे पाहुण्यांचा आदर ठेवायला आधी शिकले पाहिजे,” अशा शब्दात मंत्री केसरकरांनी शिक्षणसंस्था चालकांना सुप्रिया सुळेंसमोर खडेबोल सुनावले. पोर्टलमध्ये त्रुटी असतील तर सांगा, पण पोर्टल रद्द करा म्हणून कार्यक्रमात तुम्ही बोलणार असाल, तर पोर्टल अजिबात रद्द केले जाणार नाही,” असंही केसरकरांनी म्हटलं.



Source link

Leave a Reply