…म्हणून अभिनेता पत्नीशी करत होता Abusive Sex; गौप्यस्फोटामुळं एकच खळबळ


मुंबई : काही नाती ही शब्दांत मांडण्याच्याही पलीकडे असतात. अशाच नात्यांमधील एक म्हणजे पती- पत्नीचं नातं. या नात्यात खुलणारं प्रेम, आपुलकी, मैत्री हे सारंकाही अगदी खास. पण, काहीजणांच्या वाट्याला मात्र अशी नाती येतातच असं नाही. 

सेलिब्रिटी वर्तुळात अशी अनेक अपयशी नाती आजवर तुम्ही पाहिली असतील. बऱ्याच कारणांनी या सेलिब्रिटी मंडळींनी पती- पत्नीच्या नात्यातून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचंही तुम्ही ऐकलं, पाहिलं किंवा वाचलं असेल. अशाच एका नात्यानं गेल्या काही काळापासून सर्वांनाच धक्का दिला आहे. (Hollywood Actress Amber Heard Lawyers Claimed ex husband Johnny Depp suffered From Erectile Disfunction)

मुळात त्यांचं वेगळं होणं नवं नाही, पण त्यांनी एकमेकांव केलेले आरोप मात्र भुवया उंचावणारे होते. हे नातं म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री एम्बर हर्ड आणि अभिनेता जॉनी डेप यांचं. जॉनी आणि एम्बरमध्ये सुरु असणारा खटला संपुष्टात आला असून, अभिनेत्रीला त्याचा मोठा फटका बसला. कारण, अब्रुनुकसानीच्या या खटल्यात तिला हार पत्करावी लागली होती. 

आता म्हणे या खटल्याची कागदपत्र समोर आली आहेत. यामध्ये काही खळबळजनक दावे ही अनेकांचे कान टवकारत आहेत. 

काय म्हणालेली एम्बर? 
Amber Heard नं या खटल्याच्या सुनावणीदरम्यान त्यावेळी जॉनीच्या पुरुषत्वावर प्रश्न उपस्थित करत तो इरेक्टाइल डिस्फंक्शनचा सामना करत असल्याचं सांगितलं होतं. परिणामी तो आपल्याशी Abusive Sex करत होता असंही तिनं यामध्ये म्हटलं होतं. एम्बरच्या वकिलांनी अभिनेता यासाठी उपचार घेत असल्याचंही म्हटलं होतं. 

Johnny Depp लैंगिक समस्येशी सामना करत असल्यामुळं त्यानं एम्बरला मारहाणही केली होती. इतकंच नव्हे, एकदा नशेत धुंद असताना त्यानं तिच्या प्रायवेट पार्टमध्ये दारुची बाटलीही टाकल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला होता. 

एम्बरच्या वतीनं सांगण्यात आलेल्या माहितीनुसार जॉनी त्याची ही समस्या सर्वांपासून लपवू इच्छित होता त्यासाठीच तो संभोगावेळीही हिंसा करत होता ही माहिती समोर आली आहे. 

Amber Heard chokes back tears as she testifies ex-husband Johnny Depp  physically abused her

जॉनीच्या वतीनं काय प्रतिक्रिया? 
एम्बरकडून करण्यात आलेला हा दावा पाहता हे सर्वकाही ती जॉनीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हणत त्याच्या टीमनं हे दावे फेटाळून लावले. सदर दावा आणि उपचारांशी जॉनीचा काहीही संबंध नसल्याचं त्याच्या वकिलांनी स्पष्ट केलं.

एम्बरनं न्यायालयात ‘त्या’ प्रसंगाचा उल्लेख करत 2015 मध्ये जॉनीनं ऑस्ट्रेलियात असताना नशेमध्ये आपल्याला मारहाण केल्याचा आरोप लावला होता. त्याचवेळी त्यानं Abusive Sex केल्याचा गंभीर आरोपही तिनं न्यायालयात केला होता. Source link

Leave a Reply