Headlines

महेश भट्ट यांच्या एका फोन कॉलमुळे Vidya Balan वर चक्क रडायची वेळ; नवरा आला मदतीला धावून

[ad_1]

Vidya Balan Phone Call With Mahesh Bhatt: बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनची (Bollywood Actress Vidya Balan) ओळख आज हिंदी चित्रपटातच नाही तर जगभर पसरली आहे. विद्यानं आतापर्यंत उत्तमोउत्तम भुमिका निभावल्या आहेत. त्यातून आज तिच्या भुमिकांच्या निवडीमुळे सगळीकडेच तिची स्तुती केली जाते. अभिनयासह विद्यानं आपल्या पर्सनल लाईफसोबत आपलं प्रोफेशल लाईफही बॅलन्स केलं आहे. 

आपल्या वेगळ्या आणि नैसर्गिक अभिनयानं विद्यानं आजतागायत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. नुकताच तिचा जलसा (Jalsa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता आणि या चित्रपटातील अभिनयाचं कौतुकही केलं होतं. या चित्रपटात विद्यासह शेफाली शहा (Shefali Shah) याही होत्या. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट ही एक वेगळीच पर्वणी होती. 

विद्या बालन ही फार जास्त सोशल मीडियावर चर्चेत नसते परंतु मध्यंतरी रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर (Ranveer Singh Nude Photoshoot) विद्यानं केलेलं विधान सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा विद्या बालन वेगळ्याच एका कारणासाठी पुन्हा चर्चेत आली आहे. बॉलीवूडचे डिरेक्टर महेश भट्ट (Director Mahesh Bhatt) यांच्या एका फोन कॉलमुळे विद्यावर चक्क रडायची वेळ आली होती. 

एका मुलाखतीदरम्यान विद्यानं असाच एक किस्सा सांगितला होता. हमारी अधूरी कहानी (Hamari Adhuri Kahani), घनचक्कर (Ghanchakkar), शाही के साईड इफेक्ट्स (Shaddi Ke Side Effects) असे चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर सपशेल फ्लॉप ठरले होते. रविवारी सकाळी महेश भट्ट यांनी विद्या बालन यांना कॉल केला होता आणि तेव्हा बोलता बोलता विद्याची माफी मागितली. ते म्हणाले की विद्या आय एम सॉरी आपला अधूरी कहानी हा चित्रपट फार नाही चालला. 

या कॉलनंतर विद्या जोरजोरात रडायला लागली. तिचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि तिला आपल्या रडण्यावर कंट्रोलच होत नव्हते. शेवटी विद्या शांत झाली आणि तिनं तिच्या पतीला सिद्घार्थ रॉय कपूरला (Siddharth Roy Kapoor) हा सर्व प्रकार सांगितला आणि तेव्हा विद्याच्या नवऱ्यानं तिला चेंबूरच्या साईबाबा मंदिरात घेऊन गेला. मंदिरात जायच्यावेळी खूप पाऊस पडत होता आणि विद्या त्यावेळी कारच्या आतमध्ये बसून जोरजोरात रडत होती. त्यावेळी विद्याला खूप उदास वाटत असल्याचंही तिनं कबूल होतं. 

विद्यानं लगे रहो मुन्नाभाई (Lage Raho Munnabai), पहेली (Paheli), हैं बेबी (Hey Baby), भुलभुलैया (Bhul Bhoolaiyya), किस्मत कनेक्शन (kismat Connection), पा (Paa), द डर्टी पिक्चर (The Dirty Picture) अशा चित्रपटांतून लक्षवेधी भुमिका केल्या आहेत. विद्या बालन लवकरच अनू मेनन यांच्या नियत (Niyat) या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *