महेश बाबूच्या कुटुंबात पुन्हा लगीनघाई? चौथ्यांदा लग्न करण्यास ‘तो’ सज्ज


मुंबई : गेल्या काही वर्षांपासून दाक्षिणात्य कलाजगतानं संपूर्ण देशातही लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. या कलाविश्वातील कलाकारांनाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. अशाच कलाकारांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता महेश बाबू याचं. 

फार कमी वेळातच विविधभाषी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या महेशबाबू याच्याशीच संबंधित एक बातमी सध्या बरीच चर्चेत आहे. म्हणजे इथं त्याचा थेट संबंध नसला तरी त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीमुळं त्याच्याच नावाला चर्चेचं वलय मिळताना दिसत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार महेश बाबू याचा भाऊ, नरेश बाबू येत्या काही दिवसांमध्ये त्याची प्रेयसी कन्नड अभिनेत्री पवित्रा लोकेश हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. (rumors South indian Actor Mahesh Babus Brother Naresh to get married for fourth time)

गेल्या काही काळापासून ही जोडी रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. पण, त्या दोघांकडूनही या बातम्यांना दुजोरा देण्यात आलेला नाही. नरेश आणि पवित्राचं लग्न झाल्यास हे अभिनेत्याचं चौथं लग्न असणार आहे. 

यापूर्वी त्याचं लग्न तीन वेळा झालं होतं. पण काही कारणास्तव तिन्ही नाती फार काळ टिकू शकली नाहीत. तिथं पवित्राही सुचेंद्र प्रसाद या तिच्या पतीपासून विभक्त झाल्याचं म्हटलं गेलं. पण अद्यापही त्यांचा घटस्फोट होऊ शकलेला नाही. 

पवित्रा आणि नरेश गेल्या काही काळापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही असल्याचं म्हटलं गेलं आहे. पण, आता तिला नरेशशी लग्न करायचं झाल्यास आधीच्या पतीला घटस्फोट देणं महत्त्वाचं असेल. 

नरेश आणि पवित्रा यांच्या लग्नाची चर्चा होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी मात्र या चर्चा प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. Source link

Leave a Reply